Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 51:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 ऊठ, ऊठ, यरूशलेमे, जागी हो. तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन घेतला आहे. तू थरकापाच्या प्याल्यांतला गाळ चोखून पिऊन घेतला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 ऊठ, ऊठ! अगे यरुशलेमे, जागी हो, तू, जिने क्रोधाचा प्याला याहवेहच्या हातून भरपूर प्याला आहे, दहशतीचा प्याला तू गाळासकट पिऊन टाकला आहेस, तो प्याला, जो लोकांना मद्यधुंद करून अडखळवितो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 51:17
30 Iomraidhean Croise  

तो आपल्याच डोळ्यांनी आपला नाश पाहो; तो सर्वसमर्थाच्या संतप्त कोपाचे प्राशन करो.


दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्नी, गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल.


तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस; तू आम्हांला जणू काय झोकांड्या खाण्यास लावणारा द्राक्षारस पाजला आहेस;


तुझ्या प्रिय जनांनी मुक्त व्हावे, म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक.


दुर्जनांचा ध्वज मी खाली ओढीन,1 पण नीतिमानाचा ध्वज फडकत राहील.2


पाहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षारस फेसाळत आहे; त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो; पृथ्वीवरील सर्व दुर्जनांना तो खातरीने गाळासकट प्यावा लागेल.


थांबा, विस्मय पावा, आपले डोळे मिटा, अंध व्हा; ते मस्त झाले आहेत पण द्राक्षारसाने नव्हत; ते झोकांडे खात आहेत पण मद्याने नव्हत.


यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.


ह्यासाठी तू जी पीडित व मस्त झाली आहेस, पण मद्याने नव्हे, ती तू हे ऐक :


तुझा प्रभू परमेश्वर, आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, “पाहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो; ह्यापुढे तू तो पिणार नाहीस;


हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो; पूर्वकाळच्या दिवसांतल्याप्रमाणे, प्राचीन युगातल्याप्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्नभिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंधणारा तूच नव्हेस काय?


हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.


मी आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवले; मी त्यांना आपल्या संतापाच्या मद्याने बेहोश केले व त्यांचे रक्त भूमीवर वाहवले.


तेव्हा त्यांना तू सांग, ‘पाहा, परमेश्वर म्हणतो, मी ह्या देशाचे सर्व रहिवासी म्हणजे दाविदाच्या गादीवर बसणारे राजे, याजक, संदेष्टे व सर्व यरुशलेमनिवासी ह्यांना मद्याने मस्त करीन.


म्हणजे यरुशलेम व यहूदाची नगरे ही उद्ध्वस्त व्हावी आणि राजे व सरदार विस्मय, उपहास व शाप ह्यांचे विषय व्हावेत म्हणून त्यांना तो पाजला; आज त्यांची तशी स्थिती आहे.


“तू त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : मी तुमच्यामध्ये तलवार पाठवतो म्हणून प्या, मस्त व्हा, वांती करा, पडा, पुन्हा उठू नका.’


ह्यामुळे माझा संताप व क्रोध ह्यांचा वर्षाव झाला, तो यहूदाची नगरे व यरुशलेमेच्या आळ्या ह्यांत पेटला; ती ओसाड व वैराण झाली आहेत हे आज दिसत आहे.


“पाहा, मी यरुशलेमेस तिच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना भेलकंडवणार्‍या कटोर्‍यासारखे करतो; यरुशलेमेला घेरतील तेव्हा यहूदाचीही तीच गत होईल.1


येशू म्हणाला, “तुम्ही काय मागता हे तुम्हांला समजत नाही; जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हांला पिता येईल काय? [आणि जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घेववेल काय?]” ते त्याला म्हणाले, “आम्हांला शक्य आहे.”


नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हांला लाजवण्यासाठी बोलतो.


म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2


परमेश्वर तुला वेडा व आंधळा करील, आणि तुझे मन गोंधळून जाईल;


तू ह्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून वेडा होशील.


तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.


मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला ‘तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला’ द्यावा, म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले.


‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.


जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या मुला, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan