Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 51:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो, तो मरणार नाही, गर्तेत पडणार नाही. त्याला अन्नाची वाण पडणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जो खाली वाकलेला आहे, परमेश्वर त्यास सोडण्यास त्वरा करेल, तो मरून खाचेंत पाडला जाणार नाही, आणि त्यास अन्नाची वाण पडणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 भीतीने थिजलेल्या बंदिवानांची लवकरच सुटका होईल; ते त्यांच्या अंधारकोठडीत मरणार नाहीत, त्यांना भाकरीची उणीव भासणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 51:14
12 Iomraidhean Croise  

तेव्हा यरुशलेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जाण्यास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहूदा व बन्यामीन ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक व लेवी उठून सिद्ध झाले.


प्रभू तुम्हांला भाकरीची टंचाई व पाण्याची कमताई करील, तरी ह्यापुढे तुझे शिक्षक दृष्टिआड राहणार नाहीत; तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील.


तुझ्या काळी स्थिरता वसेल; तारण, सुज्ञता व ज्ञान ह्यांचे वैपुल्य होईल; परमेश्वराचे भय त्याचा निधी होईल.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


त्यांना तहानभूक लागणार नाही; झळई व ऊन ह्यांची बाधा त्यांना होणार नाही; कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झर्‍यांवर तो त्यांना नेईल.


परमेश्वर म्हणतो, “हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणार्‍याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.


अंगाची धूळ झाड; हे यरुशलेमे, उठून बस; सीयोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक.


यिर्मया तेथल्या तळघरात व अंधारकोठड्यांत राहिला; तेथे त्याने बहुत दिवस काढले.


तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan