Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 50:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे; माझ्याबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्यापुढे यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत. मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल? चला आपण एकमेकांचा सामना करू या! माझ्यावर आरोप करणारा कोण आहे? त्याने माझा सामना करावा!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 50:8
16 Iomraidhean Croise  

माझा कोण प्रतिवादी होईल? कोणी झाला तर मी गप्प राहून प्राण सोडीन.


हे परमेश्वरा, तू जवळ आहेस; तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.


कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग ती बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र, अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्यासंबंधीची असो, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली, तर दोघांचे प्रकरण देवासमोर1 यावे व ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजार्‍याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.


परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.


अहो द्वीपांनो, माझ्यापुढे गप्प राहा; राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत; ती जवळ येवोत मग बोलोत; निवाडा करण्यास आपण एकत्र जमू.


परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; याकोबाचा राजा म्हणतो, तुम्ही आपले बळकट पुरावे आणा.


मला स्मरण दे, आपण एकमेकांशी वाद करू; तुझे खरे ठरावे म्हणून आपली बाजू सांग.


इस्राएलाचा वंश परमेश्वराच्या ठायी नीतिमान ठरेल व त्याचा अभिमान बाळगतील.”


तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील.


तर ज्या दोघांमध्ये हा वाद उपस्थित झाला असेल त्यांना परमेश्वरापुढे म्हणजे त्या दिवसांत असणारे याजक व न्यायाधीश ह्यांच्यापुढे उभे करावे.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan