Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 50:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी आलो तेव्हा कोणी नव्हता; मी हाक मारली तेव्हा जबाब द्यायला कोणी नव्हता, ते का? मुक्त करवत नाही इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? माझ्या ठायी सोडवण्याचे सामर्थ्य नाही काय? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, नद्यांचे रान करतो; पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्यांची घाण येते, ते पाण्यावाचून मरतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी आलो पण तेथे कोणीच नव्हते का? मी हाक मारली पण कोणीच उत्तर दिले नाही का? माझा हात तुझी खंडणी देण्यास तोकडा होता? माझ्यात तुला सोडवण्याचे सामर्थ्य नाही का? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो; मी नद्यांचे वाळवंट करतो; त्यांचे मासे पाण्या अभावी मरतात आणि सडतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 50:2
46 Iomraidhean Croise  

परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.”


ह्यास्तव तुम्ही हिज्कीयास असे भुलवू व बहकवू देऊ नका; त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका; माझ्या हातातून व माझ्या वाडवडिलांच्या हातातून आपल्या लोकांचा बचाव करण्याची ताकद कोणत्याही राष्ट्राच्या किंवा राज्याच्या देवाला झाली नाही; तर माझ्या हातातून तुमचा बचाव करण्याची तुमच्या देवाला काय ताकद?”


त्याने तांबड्या समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला, आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थलांवरून त्याने त्यांना चालवले.


तो नद्यांचे रान करतो, पाण्याच्या झर्‍यांच्या जागी शुष्क भूमी करतो.


मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहवून समुद्र मागे हटवला, त्यामुळे पाण्याचे दोन भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली.


पण इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले; आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले.


नदीतले मासे मरतील आणि तिला घाण सुटेल; आणि नदीचे पाणी पिण्याची मिसरी लोकांना किळस वाटेल.”’


नदीतले मासे मेले, तिला घाण सुटली आणि मिसरी लोकांना नदीतले पाणी पिववेना; सार्‍या मिसर देशात रक्तच रक्त झाले.


मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही;


परमेश्वर मिसरी समुद्राची खाडी नष्ट करील; तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर (फरातावर) परजील; त्यावर प्रहार करून त्याचे सात फाटे करील; त्यांवरून लोकांना जोडे घालून जाता येईलसे करील.


समुद्राचे पाणी आटून जाईल, नदी आटून कोरडी होईल.


परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे; त्याने राष्ट्रांना थरथर कापवले आहे; त्याने कनानासंबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे.


ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला आहे? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?”’


मी पाहतो तर कोणी दिसेना; मी विचारतो तर त्यांच्यामध्ये उत्तर देईल असा एकही मंत्री नाही.


मी पर्वत व टेकड्या उद्ध्वस्त करीन, त्यांच्यावरचा झाडपाला सुकवीन; नद्यांची बेटे करीन, तळी आटवून टाकीन.


जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करतो,


मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’


ज्याने समुद्र आटवला, खोल सागराचे जल आटवले, उद्धरलेले पार उतरून जावेत म्हणून सागराच्या अगाध डोहांतून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय?


सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो.


पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.


कोणीच कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थ नाही म्हणून तो विस्मित झाला; तेव्हा त्याच्याच बाहूने त्याला साहाय्य केले, त्याच्या न्याय्यत्वाने त्याला आधार दिला.


मैदानातून घोडा नेतात तसे त्यांना समुद्राच्या डोहातून अडखळू न देता ज्याने नेले, तो कोठे आहे?


आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”


त्या अर्थी मी त्यांच्यासाठी दुर्दशा पसंत करीन, ज्याची त्यांना भीती वाटते ते त्यांच्यावर आणीन; कारण मी हाक मारली तेव्हा कोणी उत्तर दिले नाही, मी बोललो तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही, तर माझ्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी केले, मला जे नापसंत ते त्यांनी पसंत केले.”


स्तब्ध झालेल्या मनुष्यासारखा, वीर असून उद्धार करण्यास असमर्थ अशा पुरुषासारखा का झालास? तरी हे परमेश्वरा, तू आमच्यामध्ये आहेस, तुझे नाम आम्हांला दिलेले आहे; आमचा त्याग करू नकोस.”


रेखाबाचा पुत्र योनादाब ह्याने आपल्या वंशजांना द्राक्षारस न पिण्याविषयी आज्ञा केली, त्याप्रमाणे त्यांच्याकडून वागणूक होत आहे; त्यांनी आजवर द्राक्षारसाचे सेवन केले नाही; आपल्या पूर्वजांची आज्ञा त्यांनी मानली; पण मी मोठ्या निकडीने तुम्हांला सांगत आलो तरी तुम्ही माझे ऐकले नाही.


मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.


यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.


परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली, मी तुमच्याशी मोठ्या निकडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हांला हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही;


तू ही सर्व वचने त्यांना सांगशील तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मारशील पण ते तुला उत्तर देणार नाहीत.


मी कान देऊन ऐकले पण ते ठीक बोलत नाहीत; त्यांच्या दुष्टतेचा त्यांना पश्‍चात्ताप होत नाही; ‘मी हे काय केले?’ असे कोणी म्हणत नाही; घोडा रणात धाव घेतो तसे ते सर्व उलटून आपल्या मार्गावर जातात.


आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?”


ह्याकरता मी फर्मावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, ह्यांपैकी जे कोणी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात येतील; त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील; कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही.”


तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?”


ज्याने दानिएलास सिंहांच्या पंजांतून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे; तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे.”


जो जो मी बोलावी, तो तो ते माझ्यापासून दूर जात; ते बआलमूर्तींना बली अर्पण करत, कोरीव मूर्तीपुढे धूप जाळत.


माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत.


तो समुद्रास दटावून आटवतो, सर्व नद्या कोरड्या करतो; बाशान व कर्मेल त्याच्यापुढे म्लान होतात, लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.


परमेश्वर नद्यांवर रागावला आहे काय? नद्यांवर तुझा राग पेटला आहे काय? तुझा क्रोध समुद्रावर खवळला आहे काय? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास काय?


परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे? माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील.”


तेव्हा त्याने उठून वार्‍याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला व अगदी निवांत झाले.


जे त्याचे स्वतःचे2 त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.


निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.


तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्‍याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan