Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 50:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 जे तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही कोलिते वागवता ते तुम्ही सर्व आपल्याच अग्नीच्या ज्वालेत चालते व्हा! तुम्ही स्वतः पेटवलेल्या कोलितांत जाऊन पडा! माझ्या हातून हे तुम्हांला घडेल; तुम्ही क्लेशात पडून राहाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पाहा, जे सर्व तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही स्वतःला मशालीसह सुसज्ज करता; ते तुम्ही आपल्या अग्नीच्या प्रकाशात आणि तुम्ही पेटविलेल्या ज्योतीत चाला. परमेश्वर म्हणतो, माझ्या हातून, हे तुमच्याकडे येईलः तुम्ही वेदनेच्या जागी खाली पडून रहाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता आणि स्वतःला जळत्या मशालीचा पुरवठा करता, जा, तुम्ही स्वतः प्रज्वलित केलेल्या, आणि तुम्ही ज्वलंत केलेल्या मशालीच्या प्रकाशात चला, माझ्यापासून मात्र तुम्हाला हे प्राप्त होईल: तुम्ही यातनामध्ये पडून राहाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 50:11
30 Iomraidhean Croise  

जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दु:खे होतील; ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नांवे उच्चारणारही नाही.


दुर्जनाला पुष्कळ दु:खे भोगावी लागतात; परमेश्वरावर भाव ठेवणार्‍यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते.


जो आपल्या शेजार्‍याला फसवतो आणि म्हणतो की, “मी थट्टा नव्हतो का करीत?” तो कोलिते, बाण व मारक शस्त्रे फेकणार्‍या वेड्यासारखा आहे.


जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.


ते पृथ्वीकडे पाहतील तर पाहा, संकट, अंधकार व दुःखाचे काहूर त्यांना दिसेल; ते निबिड काळोखात लोटले जातील.


दुष्टता अग्नीसारखी पेट घेते; ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकते; वनातील झाडीतही ती पेट घेते; त्यांच्या धुराचा लोळ वर चढतो.


मी तुला जे वतन दिले ते तुझ्या हातचे जाईल; तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी तुम्ही भडकवला आहे. तो सर्वकाळ जळत राहील.”


ह्यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएल घराण्या, जा, आपल्या हव्या त्या मूर्तीची पूजा कर; पण पुढे तुम्ही खरोखर माझे ऐकाल, आणि आपल्या अर्पणांनी व मूर्तींनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावणार नाही.


“मिसर देशातल्याप्रमाणे मी तुमच्यात मरी पाठवली; तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तलवारीने वधले आहेत; तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईलसे मी केले; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


“तांबेरा व भेरड ह्यांच्या योगे मी तुमचे ताडन केले; तुमच्या बागा, तुमचे द्राक्षीचे मळे, तुमची अंजिराची झाडे व तुमची जैतून झाडे, कुरतडणार्‍या टोळांनी खाऊन टाकली; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात;


पाहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात, हे सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून नव्हे काय?


तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’


परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.”


म्हणून मी तुम्हांला सांगितले की, तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आहे1 असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल.”


तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे; ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”


कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत.


जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan