Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 जे घराशी घर व शेताशी शेत जोडून घेतात, जागा मुळीच उरू देत नाहीत, त्यांना धिक्कार असो; तुमचीच काय ती देशात वस्ती आहे असे झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जे घराला घर आणि आपण देशामध्ये रहावे म्हणून जागा न उरेपर्यंत शेताला शेत लावतात, त्यांना हाय हाय!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता, आणि जोपर्यंत जागा संपत नाही शेताला शेत जोडून घेतात, आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:8
14 Iomraidhean Croise  

ओसाड नगरात, राहण्यास अयोग्य अशा घरात, ओस व्हावे म्हणून सोडलेल्या जागेत तो राहत आहे.


त्याने ग्रासले नाही असे काही राहिले नाही, म्हणून त्याची समृद्धी टिकायची नाही.


धनलोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो, पण ज्याला लाचेचा तिटकारा असतो तो वाचतो.


“मानवपुत्रा, जे यरुशलेमनिवासी, ‘परमेश्वरापासून दूर राहा, आम्हांलाच देश वतन मिळाला आहे,’ असे म्हणतात ते तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, तुझे आप्तजन, इस्राएलाचे सबंध घराणे आहेत;


“मानवपुत्रा, इस्राएल देशाच्या उजाड झालेल्या प्रदेशात राहणारे असे म्हणत आहेत की, ‘अब्राहाम एक असून त्याला ह्या देशाचे वतन मिळाले; आम्ही तर बहुत आहोत आणि देश आम्हांला वतनादाखल दिला आहे.’


परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.


जे अनर्थाचा संकल्प करतात व बिछान्यावर पडल्या-पडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे.


ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात.


हे सर्व त्याला कवन, कूटवचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील, “आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करतो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो, त्याला धिक्कार असो; असे कोठवर?”


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan