Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी तो उद्ध्वस्त करीन; त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही; त्यात काटेसराटे उगवतील; त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी तो उजाड करीन, त्यास खच्ची करणार नाहीत व कुदळणार नाहीत, पण तण व काटेकुटे फुटतील, तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:6
32 Iomraidhean Croise  

एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली आणि पर्जन्यवृष्टी खुंटली असता त्यांनी ह्या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यांना दीन केल्यामुळे ते तुझ्याकडे वळले,


तर त्यात गव्हाच्या ऐवजी काटेधोतरे, जवाच्या ऐवजी कुसळे उगवोत.” येथे ईयोबाचे भाषण समाप्त झाले.


तेव्हा तो काटेर्‍यांनी भरून गेला आहे, त्याची जमीन खाजकुइरीने व्यापली आहे, व त्याची दगडी भिंत कोसळली आहे, असे मला आढळले.


नगरात नुसती ओसाडी झालेली आहे; वेशीचा भुगाभुगा झाला आहे.


तू भूमीत आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील; भूमी पीक देईल ते अन्न रसभरीत व सत्त्वपूर्ण असेल; त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील.


अहो निश्‍चिंत स्त्रियांनो, एका वर्षाहून काही दिवस अधिक तुम्ही बेचैन व्हाल; कारण द्राक्षांचा हंगाम बुडेल, फळे हाती लागणार नाहीत.


तुझी उजाड व ओसाड स्थळे व तुझी उद्ध्वस्त भूमी ह्यांविषयी म्हणशील तर तुझ्या ठायी वस्तीला जागा पुरणार नाही; तुला ग्रासून टाकणारे दूर गेले आहेत.


काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल; ह्यावरून परमेश्वराचे नाव होईल; ते सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही.”


त्या सगळ्या येऊन खडकाळ खोर्‍यांत, खडकांच्या कपारींत, सगळ्या काटेरी झुडपांत व सर्व कुरणांत उतरतील.


अवर्षणाविषयी यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


विदेश्यांच्या निरुपयोगी दैवतांत कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.


हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील.


ह्यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लावले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट.


बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे.


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.


त्यांनी माझ्या द्राक्षवेलांची नासधूस केली आहे; माझ्या अंजिराच्या झाडाच्या ढलप्या काढल्या आहेत; सोलून सोलून त्यांनी त्याची साल काढून टाकली आहे; आणि त्याच्या फांद्या पांढर्‍या झाल्या आहेत.


“कापणीला अद्यापि तीन महिने आहेत तोच पाऊस तुमच्याकडे जाऊ नये म्हणून मी तो आवरून धरला; तो एका नगरावर पडावा, एकावर पडू नये, असे मी केले; एका शेतावर पाऊस पडला, एका शेतावर पडला नाही; ते सुकून गेले.


ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’


आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल;


त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत ‘पाऊस पडू नये’ म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे; ‘पाण्याचे रक्त करण्याचा’ अधिकार त्यांना पाण्यावर आहे, आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला ‘सर्व पीडांनी पीडित करण्याचाही’ त्यांना अधिकार आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan