Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आता मी आपल्या द्राक्षीच्या मळ्याचे काय करणार ते तुम्हांला सांगतो : मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो खाऊन टाकतील; त्याचे आवार मोडीन म्हणजे तो तुडवला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन. मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडवीली जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आता मी तुम्हाला सांगेन, मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे: मी त्याचे कुंपण काढून टाकेन, आणि त्याचा नाश होईल; मी त्याची भिंत पाडेन, आणि ते तुडविले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:5
31 Iomraidhean Croise  

मग ते म्हणाले, “चला, आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.”


तर चला, आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही.”


मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत; माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही?”


तू त्याचे सर्व तट मोडून टाकले आहेत त्याच्या गढ्या जमीनदोस्त केल्या आहेत.


सर्व येणारेजाणारे त्याला लुटतात; तो आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना निंदेचा विषय झाला आहे.


तेव्हा तो काटेर्‍यांनी भरून गेला आहे, त्याची जमीन खाजकुइरीने व्यापली आहे, व त्याची दगडी भिंत कोसळली आहे, असे मला आढळले.


वधण्याचा समय व बरे करण्याचा समय; मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो;


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.


मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द होईल; अधोलोकाबरोबर केलेला तुमचा संकेत टिकणार नाही; संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायमल्ली होईल.


एफ्राइमातील मद्यप्यांचा दिमाखखोर मुकुट पायांखाली तुडवतील.


अहो निश्‍चिंत स्त्रियांनो, एका वर्षाहून काही दिवस अधिक तुम्ही बेचैन व्हाल; कारण द्राक्षांचा हंगाम बुडेल, फळे हाती लागणार नाहीत.


तर आता यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांना जाऊन सांग : ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुमच्यावर अनर्थ योजत आहे, तुमच्याविरुद्ध मनसुबा योजत आहे; तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा.’


‘इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, पाहा, तटाबाहेर तुम्हांला वेढा घालणारा बाबेलचा राजा व खास्दी लोक ह्यांच्याशी ज्या शस्त्रांनी तुम्ही लढत आहात ती मी उलटवीन आणि त्यांना ह्या नगरामध्ये एकत्र करीन.


माझ्या व तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी, अनेक देश व मोठी राज्ये ह्यांच्यावर लढाई, अरिष्ट व मरी येईल असा त्यांच्याविरुद्ध संदेश दिला.


ह्यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लावले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट.


प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत; माझ्या तरुणांना चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्याविरुद्ध प्रचंड समुदाय बोलावला आहे; यहूदाच्या कुवार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडवले आहे.


बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे; त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे; परमेश्वराने, सण व शब्बाथ ह्यांचा सीयोनेत विसर पाडला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाने राजा व याजक ह्यांचा धिक्कार केला आहे.


विरोधी व शत्रू यरुशलेमेच्या वेशीत शिरतील, ह्या गोष्टीवर पृथ्वीवरचे राजे, जगातले सर्व रहिवासी ह्यांनी विश्वास ठेवला नाही.


तेव्हा मी एका पवित्र पुरुषाला बोलताना ऐकले; दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणार्‍यास म्हणाला, “हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्रस्थान व सैन्य ही पायांखाली तुडवणे, ह्या दृष्टान्तात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार?”


ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ‘ही माझ्या वल्लभांनी दिलेली माझी वेतने आहेत.’ ती मी उद्ध्वस्त करीन; मी त्यांचे रान बनवीन, आणि ती वनपशू खाऊन टाकतील.


ह्यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन.


ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’


तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan