Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्या दिवशी समुद्रगर्जनेप्रमाणे ते त्यांच्यावर गर्जना करतील; भूमीकडे पाहावे तर अंधकार व संकट; तेथील अभ्रांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 त्या दिवशी जसा समुद्रगर्जना करतो त्या प्रमाणे ते आपल्या भक्ष्याविरूद्ध गर्जना करतील. जर कोणी भूमीकडे दृष्टी लावली तर पाहा अंधार व संकट आणि तिच्यावरील अभ्रांनी प्रकाश जाऊन अंधार झालेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 त्या दिवशी ते त्याच्यावर समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करतील. आणि जर कोणी भूमीकडे पाहिले तर, तिथे फक्त अंधार आणि संकट आहे; ढगांमुळे सूर्यदेखील काळवंडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:30
24 Iomraidhean Croise  

त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील.


आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत; सूर्य उदय पावताच काळाठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही.


ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे! एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे! सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे.


अरेरे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला! समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करतात; केवढी ही राष्ट्रांची खळबळ! ती महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात!


दक्षिणेतल्या पशूंविषयीची देववाणी : ज्यात सिंहीण व सिंह, सर्प व उडता आग्या साप ही असतात अशा कष्टमय व संकटमय देशात जवान गाढवांच्या पाठीवर आपली दौलत व उंटांच्या मदारींवर आपले खजिने लादून ज्याच्यापासून काही लाभ होणार नाही अशा राष्ट्राकडे ते घेऊन जातात.


म्हणून न्याय आमच्यापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हांला प्राप्त होत नाही; आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो तर अंधकार; उजेडाची आशा करतो पण आम्ही काळोखात चालू लागतो.


ते पृथ्वीकडे पाहतील तर पाहा, संकट, अंधकार व दुःखाचे काहूर त्यांना दिसेल; ते निबिड काळोखात लोटले जातील.


परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.


“परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही थरकाप झालेल्यांचा शब्द ऐकला आहे, दहशत आहे, शांती नाही.


ते धनुष्य व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही; ते सागराप्रमाणे गर्जना करतात, ते घोड्यांवर स्वार झाले आहेत. हे बाबेलकन्ये, ते युद्धास सिद्ध झाल्याप्रमाणे तुझ्यावर येत आहेत.


ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”


त्याने मला घेऊन जाऊन, उजेडात नव्हे, तर अंधारात चालायला लावले.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अगे सोरे, मी तुझ्याविरुद्ध आहे, समुद्र आपल्या लाटा लोटतो त्याप्रमाणे मी तुझ्यावर बहुत राष्ट्रे लोटीन.


त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. सूर्य व चंद्र काळे पडतात आणि तारे प्रकाशण्याचे थांबतात.


परमेश्वराचा दिवस यावा अशी जे इच्छा बाळगतात, त्यांना धिक्कार असो! परमेश्वराचा दिवस येण्याची तुम्ही का इच्छा करता? तो अंधकारमय आहे, प्रकाशमय नव्हे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन.


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan