Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ते सिंहासारखी गर्जना करीत आहेत; ते तरुण सिंहाप्रमाणे गुरगुरत आहेत व गुरगुरून शिकार पकडत आहेत; ते ती घेऊन जात आहेत, कोणी सोडवत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 त्यांची गर्जना जणूकाय सिंहाच्या गर्जनेसारखी असणार, तरूण सिंहासारखे ते गर्जना करतील. ते गर्जतील आणि आपल्या भक्ष्याला पकडून खेचत नेतील, वाचवणारा कोणीच नसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:29
20 Iomraidhean Croise  

यहूदा सिंहाचा छावा आहे; माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस; तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे, त्याला कोण छेडणार?


अहो देवाला विसरणार्‍यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही.


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


परमेश्वर मला म्हणाला, “जसा सिंह, तरुण सिंह, आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलावून त्याच्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरायचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबायचा नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढायला उतरेल.”


तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाहीत; पण तेथे उद्धरलेले संचार करतील.


तरी हे लुटलेले, नागवलेले लोक आहेत; ते सर्व गर्तांच्या पाशात सापडले आहेत, कारागृहात कोंडले आहेत; ते भक्ष्य झाले आहेत, त्यांना सोडवणारा कोणी नाही; ते लूट झाले आहेत, आणि “ती परत द्या” असे म्हणणारा कोणी नाही.


तू ज्यांच्यासाठी शिणलीस त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे; तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत; तुझा बचाव करणारा कोणी नाही.


तरुण सिंहांनी त्याच्यावर गर्जना केली आहे, त्यांनी महानाद केला आहे; त्यांनी त्याचा देश उजाड केला आहे, त्याची नगरे जाळून-पोळून निर्जन केली आहेत.


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


पाहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणार्‍या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल; मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन, व ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


ते जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतात; सिंहिणींच्या पेट्यांप्रमाणे ते गुरगुरतात.


ते परमेश्वरामागून जातील, तो सिंहासारखा गर्जेल, तो गर्जेल आणि त्यांचे पुत्र पश्‍चिमेकडून थरथर कापत येतील.


सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?”


वनपशूंत सिंह, मेंढरांत तरुण सिंह गेला असता तो त्यांना तुडवून फाडतो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रांत, बहुत लोकांत होतील.


सिंहांची गुहा कोठे आहे? तरुण सिंहांची खुराक खाण्याची जागा कोठे आहे? जेथे सिंह, सिंहीण व सिंहाचा छावा ही फिरत असत व कोणी त्यांना भेडसावत नसे ते ठिकाण कोठे आहे?


तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.


ऐका, मेंढपाळांचा हाहाकाराचा शब्द होत आहे! कारण त्यांचे वैभव लयास गेले आहे; ऐका, तरुण सिंहाची थोर गर्जना होत आहे! कारण यार्देनेचे घोर अरण्य लयास गेले आहे.


तो सिंहाप्रमाणे, सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे, तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडील? जो तुझे अभिष्ट चिंतील, त्याचे अभिष्ट होईल; जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan