यशायाह 5:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
27 त्यांतील कोणी थकलेला, कोणी ठोकर खाल्लेला नाही; कोणी डुलकी किंवा झोप घेणारा नाही, कोणाचा कमरबंद सैल झालेला नाही, कोणाच्या वहाणांचे बंद तुटलेले नाहीत;
27 त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही, एकजणसुद्धा डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही; एकाही कमरेचा पट्टा सैल केलेला नाही, एकाही चप्पलेचा पट्टा तुटलेला नाही.
सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली.
परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो.