Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ह्यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते तसे त्यांचे मूळ कुजलेल्या पदार्थासारखे होईल; त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल; कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे नियमशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे वचन अव्हेरले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 यास्तव ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते, त्याप्रमाणे त्यांचे मूळ कुजणार आणि त्यांचा बहर धूळीसारखा उडला जाईल. कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला आणि इस्राएलाच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात आणि जसे कोरडे गवत ज्वालेमध्ये राख होते, तशीच त्यांची मुळे कुजून जातील, आणि त्यांची फुले वाऱ्याने धुळीसारखी उडून जातील; कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचे नियम नाकारले आहे आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वराचे वचन झिडकारले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:24
44 Iomraidhean Croise  

तू कोणाची निंदा केलीस? कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस? कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भुवया चढवल्या? इस्राएलाचा जो पवित्र त्यावर!


पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्याविरुद्ध बंड केले; तुझे नियमशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले; तुझ्याकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्ट्यांनी निक्षून सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले आणि तुला संतप्त केले.


खालून त्याचे मूळ सुकेल, व वरून त्याची डाहळी छाटतील.


त्याची मुळे दगडांच्या राशींना वेष्टतात. तो खडकाळ जमिनीत शिरतो.


तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस.


आपल्याविरुद्ध बंड करणार्‍यांना तू आपल्या महाप्रतापाने उलथून टाकतोस; तू आपला संताप भडकवतोस, तो त्यांना भुसाप्रमाणे भस्म करतो.


तेव्हा ते लोक गवताऐवजी धान्याचे सड जमा करण्यासाठी सर्व मिसर देशभर पांगले.


बलाढ्य मनुष्य पिंजलेल्या तागासारखा होईल, आणि त्याच्या हातचे काम ठिणगी होईल; ती दोन्ही बरोबरच जळतील, ती कोणी विझवणार नाही.


किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.


ह्यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगत आहेत; पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


ह्यामुळे इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, “तुम्ही ह्या वचनाचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार ह्यांवर भिस्त ठेवता व अवलंबून राहता;


कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत; ज्यांना परमेश्वराचे नियमशास्त्र ऐकायला नको अशी ही मुले आहेत.


पाहा, ते धसकटासारखे झाले आहेत, अग्नीने त्यांना भस्म केले आहे; ज्वालेच्या तडाख्यातून त्यांना स्वत:चा बचाव करता येईना. हा शेकत बसण्याचा विस्तव नव्हे, भोवती बसण्याच्या शेगडीचा अग्नी नव्हे.


एफ्राइमाचे शीर शोमरोन व शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही.”’


“हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारतात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्या सहवासात आनंद पावतात;


दुष्टता अग्नीसारखी पेट घेते; ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकते; वनातील झाडीतही ती पेट घेते; त्यांच्या धुराचा लोळ वर चढतो.


सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे; लोकही जसे काय अग्नीला सरपण झाले आहेत; आपल्या भावालाही कोणी सोडत नाही.


अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी ह्या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती, त्यांच्यावर आणीन; कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे.


शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेधा उडून ते पकडले जातात; पाहा, परमेश्वराचे वचन ते धिक्कारतात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार!


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, मी वनवृक्षांतील द्राक्षलता अग्नीत सरपण म्हणून टाकतो त्याप्रमाणे यरुशलेमनिवाशांना अग्नीत टाकीन.


मी आपल्या क्रोधसंतापाप्रमाणे करणार नाही, मी एफ्राइमाचा नाश करण्याकरता मागे फिरणार नाही; कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे; तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे; मी क्रोधावेशाने येणार नाही.


ह्यास्तव मी एफ्राइमास कसरीसारखा व यहूदाच्या घराण्यास किडीसारखा झालो आहे.


एफ्राइमावर तडाका बसला आहे; त्याचे मूळ सुकून गेले आहे; त्यांना फळ येणार नाही; त्यांना संतती झालीच तर त्यांच्या गर्भाशयाचे ते प्रिय फळ मी मारून टाकीन.


ते उड्या टाकतात, त्यांचा आवाज डोंगरमाथ्यांवरून जाणार्‍या रथांच्या आवाजासारखा आहे; धसकट खाऊन टाकणार्‍या ज्वालेच्या कडकडण्यासारखा ते आवाज करतात; युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत.


परमेश्वर म्हणतो, “यहूदाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र धिक्कारले आहे, त्यांनी त्याचे विधी पाळले नाहीत; व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टींना अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत.


मी तर त्यांच्यापुढून अमोरी लोकांचा संहार केला; त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते; मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासवले.


ते गुंतागुंत झालेल्या काटेर्‍यांसारखे असले, ते द्राक्षारसाने मस्त झालेल्यांप्रमाणे असले, तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.


पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”


जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो; जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो; आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”


आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठवण्यास त्याचे सूप त्याच्या हातात आहे; पण भूस तो न विझणार्‍या अग्नीत जाळून टाकील.”


परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.


जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे; जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील.


‘अहो धिक्कार करणार्‍यांनो, पाहा, आश्‍चर्य करा व नाहीसे व्हा; कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, ते कार्य असे की, त्याविषयी तुम्हांला कोणी सविस्तर सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही.”’


परमेश्वर तुझ्या देशावर पावसाऐवजी धुळीची व मातीची वृष्टी करील; तू नष्ट होईपर्यंत ती आकाशातून तुझ्यावर पडत राहील.


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन1 ह्यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे.”


शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत येणार नाही; कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला आहे, आणि परमेश्वराने इस्राएलावरील राजपदावरून तुला झुगारले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan