Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 जे वाइटाला बरे व बर्‍याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानतात त्यांना धिक्कार असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात, जे कडुपणाला गोड असे व गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 धिक्कार असो, जे वाईटाला चांगले म्हणतात आणि चांगल्याला वाईट म्हणतात, जे अंधाराला प्रकाश आणि प्रकाशाला अंधार, जे गोड त्याला कडू आणि कडू त्याला गोड असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:20
23 Iomraidhean Croise  

ते रात्रीला दिवस ठरवतात; ‘अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे’ असे ते म्हणतात.


खोट्या मुकदम्यापासून दूर राहा; निरपराधी व नीतिमान ह्यांचा वध करू नकोस, कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही.


दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा, ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट येतो.


कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात,


ते गात-गात द्राक्षारस पीत नाहीत, मद्यप्यांना मद्य कडू लागते.


ते नुसत्या शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवतात, वेशीवरील स्पष्ट वक्त्यासाठी जाळे पसरतात व नीतिमानास धडधडीत लबाडीने उलथून पाडतात;


ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;


मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत.


लबाडीस कान देणार्‍या माझ्या लोकांना तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यांना मारून व जे जगू नयेत त्यांना वाचवून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे.


न्यायाचा कडूदवणा करणारे व नीतिमत्ता धुळीस मिळवणारे लोकहो,


तुम्ही बर्‍याचा द्वेष करता व वाइटाची आवड धरता; तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढता व त्यांच्या हाडांवरच्या मांसाचे लचके तोडता;


अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही; दुष्ट नीतिमानास घेरून सोडतो म्हणून न्याय विपरीत होतो.


तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला?’ तुम्ही म्हणता, ‘प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्यासंबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे?’ अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे.


आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो; दुराचारी संपन्न झाले आहेत; त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे.”’


त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.


लोकांमध्ये काही वाद उपस्थित झाला आणि ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा निवाडा करावा; निर्दोष्याला निर्दोषी ठरवावे आणि दोष्याला दोषी ठरवावे.


तर (आपल्या) लोकांतही खोटे संदेष्टे होते तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील; ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील; ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील, आणि आपणांवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan