Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 जे दुष्टतेच्या दोर्‍यांनी दुष्कर्माला, जसे काय गाडीच्या दोराने पापिष्ठपणाला ओढून आणतात, त्यांना धिक्कार असो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जे रितेपणाच्या दोऱ्यांनी अन्याय ओढतात आणि जे गाडीच्या दोरांनी पाप ओढतात त्यांना हाय हाय!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात, आणि दोरीने गाडी ओढल्यागत जे दुष्टता ओढवून घेतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:18
23 Iomraidhean Croise  

तो आपल्या मनात म्हणतो की, “देवाला विसर पडला आहे, त्याने आपले तोंड लपवले आहे, तो हे कधीच पाहणार नाही.”


मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही,” लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही.


आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो.


कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात,


तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.”


कारण जारकर्म्यांनी देश व्यापला आहे; शापामुळे भूमी शोक करीत आहे; रानातील कुरणे वाळली आहेत; लोकांची गती वाईट आहे, त्यांचा पराक्रम म्हटला तर अधर्म;


यरुशलेमेतल्या संदेष्ट्याच्या ठायीही मी एक घोर प्रकार पाहिला आहे; ते जारकर्म करतात व लबाडीने चालतात; ते दुष्कर्म्यांचे हात असे दृढ करतात की त्यांच्यातला कोणी आपल्या दुष्कर्मांपासून वळत नाही; ते सर्व मला सदोमासारखे झाले आहेत, व त्याचे रहिवासी गमोरासारखे झाले आहेत.”


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा असे झाले की यहूदीने तीनचार पाने वाचून दाखवताच राजाने तो पट चाकूने कापून शेगडीतल्या पेटत्या आगीत टाकला; येणेप्रमाणे तो सगळा त्या शेगडीच्या आगीत भस्म झाला.


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


कारण ज्या नीतिमानास मी दुखवले नाही त्याचे मन तुम्ही खोटे बोलून दुखवता, आणि दुष्टाने आपल्या कुमार्गापासून वळू नये, आपला जीव वाचू नये असे तुम्ही त्याच्या हाताला बळ देता;


त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.


ते तुम्हांला सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणार्‍या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.


मलाही खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात;


मग मीखा म्हणाला, “मी एक लेवी आपला पुरोहित करून ठेवल्यामुळे परमेश्वर माझे कल्याण करील अशी मला आता खात्री आहे.”


ह्या मीखाचे एक देवघर होते. त्याने एक एफोद आणि काही तेराफीम (कुलदेवतेची मूर्ती) तयार केल्या व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan