Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ह्यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा वाढवली आहे, आपले तोंड अमर्याद पसरले आहे; त्यात त्यांचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, तेथले मौज मारणारे पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 यास्तव मृत्यूने आपली भुक वाढवली आहे आणि आपले तोंड मोठे उघडले आहे. आणि त्यांचे उत्तम लोक, त्यांचा समुदाय, त्यांचे अधिकारी, आणि त्यांच्यातील मौजमजा करणारे आणि आनंदी, हे अधोलोकात जातील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 म्हणून मृत्यू त्याचे जबडे पसरवितो, त्याचे तोंड मोठे करून उघडतो. त्यांचे उच्चकुलीन आणि जनसमूह, त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भांडखोर आणि चंगळ करणारे त्यामध्ये उतरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:14
26 Iomraidhean Croise  

ते मेंढरांच्या कळपासारखे अधोलोकासाठी नेमलेले आहेत; मृत्यू त्यांचा मेंढपाळ आहे; प्रभातकाल झाला म्हणजे नीतिमान त्यांच्यावर प्रभुत्व करतील; त्यांचे देह अधोलोकात क्षय पावतील; त्यांना वस्तीला कोठे थारा राहणार नाही;


त्यांना अकस्मात मरण येवो; ते जिवंतच अधोलोकी उतरोत; त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे.


त्यांना जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणार्‍यांप्रमाणे सात्त्विकांना गिळून टाकू.


अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत.


त्या ह्या : अधोलोक, वांझेचे उदर, पाण्याने कधी पोट भरत नाही अशी पृथ्वी, “पुरे” म्हणून कधी न म्हणणारा अग्नी.


तुझा डामडौल, तुझ्या सारंग्यांचा नाद अधोलोकात उतरत आहे; तुझ्याखाली कृमींचे अंथरूण झाले आहे, आणि वरून तुला कीटकांचे पांघरूण झाले आहे.


खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ गडबड उडाली आहे; तो तुझ्यासाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व प्रमुखांना जागृत करीत आहे; राष्ट्रांच्या सर्व राजांना त्यांच्या-त्यांच्या सिंहासनावरून उठवत आहे.


माझे हृदय धडधडते; भीतीने मी त्रस्त झालो आहे; माझी आवडती वेळ संध्याकाळ मला कंपित करणारी झाली आहे.


डफांचा हर्षनाद बंद पडला आहे, उत्सव करणार्‍यांचा कल्ला थांबला आहे, किनरीचा हर्षनाद बंद झाला आहे.


कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.


समय आला आहे, दिवस समीप आला आहे; विकत घेणारा आनंद न करो, विकणारा खेद न पावो; कारण त्या सर्व समूहावर क्रोध येत आहे.


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


ते गुंतागुंत झालेल्या काटेर्‍यांसारखे असले, ते द्राक्षारसाने मस्त झालेल्यांप्रमाणे असले, तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.


शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे; तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही, त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढवली आहे. तो मृत्यूसारखा अतृप्त आहे, तो सर्व राष्ट्रांना आपणाजवळ जमा करतो, सर्व लोकांना आपल्यानजीक एकत्र करतो.”


अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत;


‘नोहा तारवात गेला’ आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न करून देत होते.


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan