Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत; त्यांतले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत, आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 यास्तव माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणांत गेले आहेत, त्यांचे अधिकारी भुकेले आहेत आणि त्यांच्या समुदायाला पिण्यास पाणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 म्हणून असमजंसपणामुळे माझे लोक बंदिवासात नेले जातील; उच्च पदावरील लोक भुकेने मरतील आणि सर्वसाधारण लोक तहानेने कोरडे पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:13
26 Iomraidhean Croise  

होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


नीतिमानाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात.


बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो; पण इस्राएल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाहीत.”


तुमचा देश ओसाड आहे; तुमची नगरे अग्नीने जळाली आहेत; तुमची शेते परके लोक तुमच्यादेखत खाऊन टाकत आहेत; परक्यांनी उद्ध्वस्त केल्याप्रमाणे ती ओसाड झाली आहेत.


सर्व डामडौलास बट्टा लागावा व जगातील सर्व महाजनांची अप्रतिष्ठा व्हावी, म्हणून हे सेनाधीश परमेश्वराने योजले आहे.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, हा यरुशलेम व यहूदा ह्यांचा आधार व टेका काढून घेतो, म्हणजे भाकरीचा सर्व आधार व पाण्याचा सर्व आधार काढून घेतो;


पन्नासांचा नायक, प्रतिष्ठित पुरुष, मंत्री, शिल्पप्रवीण व मंत्रनिपुण ह्यांना काढून घेतो.


कोणी हे ध्यानात आणत नाही; “त्याचा अर्धा भाग आपण अग्नीत जाळला, त्याच्या निखार्‍यांवर भाकर भाजली, मांस भाजून खाल्ले आणि त्याच्या अवशेषाची अमंगल वस्तू मी कशी बनवू? झाडापासून काढलेल्या लाकडाच्या पाया मी कसा पडू?” असे म्हणण्याइतके कोणाला ज्ञान नाही, अक्कल नाही.


तेव्हा तू आपल्या मनात म्हणशील, ‘माझी मुले तर हिरावून नेली आहेत, मी वांझ आहे, मी स्वदेशाला मुकले आहे, व परागंदा झाले आहे, अशा माझ्यासाठी ह्यांना जन्म कोणी दिला? ह्यांना लहानाचे मोठे कोणी केले? पाहा, मी एकटीच उरले होते; ही कोठे होती?”’


ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;


मी वनात जातो तर पाहा, तेथे तलवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तर दुष्काळाने पिडलेले मला आढळतात; कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत.”’


त्यांच्यातले श्रेष्ठ जन आपल्या कनिष्ठांना पाण्यासाठी पाठवतात; ते विहिरीवर जातात पण त्यांना पाणी मिळत नाही, ते रिकाम्या घागरी घेऊन येतात; ते लज्जित व फजीत होऊन आपली डोकी झाकून घेतात.


आकाशातील करकोची आपला नेमलेला समय जाणते; होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळचे स्मरण ठेवतात; पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखत नाहीत.


क्षुधेने मारलेल्यांपेक्षा तलवारीने मारलेले पुरवले; कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकूळ होऊन क्षय पावतात.


समय आला आहे, दिवस समीप आला आहे; विकत घेणारा आनंद न करो, विकणारा खेद न पावो; कारण त्या सर्व समूहावर क्रोध येत आहे.


ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.


त्या समयी सुंदर तरुणी व तरुण तहानेने मूर्च्छित होतील.


तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”


आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


कारण ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan