Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 जे पहाटेस उठून मद्याच्या पाठीस लागतात, जे अपरात्रीपर्यंत द्राक्षारस पिऊन धुंद होतात त्यांना धिक्कार असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय! जे तुम्ही मद्यापानाने धुंद होऊन रात्री उशिरापर्यंत जागत राहता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:11
21 Iomraidhean Croise  

आज मी ऐंशी वर्षांचा आहे; ह्या वयात मला बर्‍यावाइटाचा भेद काय समजणार? आपला दास जे काही खातोपितो त्याची चव त्याला कळते काय! गाणार्‍यांचा व गाणारणींचा शब्द मला ऐकू येतो काय? तर आपल्या दासाने माझ्या स्वामीराजांना भार का व्हावे?


द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.


शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झोंबतो.


पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत.


ते गात-गात द्राक्षारस पीत नाहीत, मद्यप्यांना मद्य कडू लागते.


एफ्राइमातील मद्यप्यांच्या दिमाखखोर मुकुटाचा, द्राक्षारसाने झिंगलेल्यांच्या सुपीक खोर्‍याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याचा समूळ नाश होणार.


एफ्राइमातील मद्यप्यांचा दिमाखखोर मुकुट पायांखाली तुडवतील.


ज्यांचे शौर्य द्राक्षारस पिण्यात आणि ज्यांची बहादुरी मद्य मिसळण्यात


ते म्हणतात, “चला, या, मी द्राक्षारस घेऊन येतो; आपण मद्याने मस्त होऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो अतिशय चैनीचा होईल.”


जो आपल्या शेजार्‍याला मद्य पाजतो त्याला धिक्कार असो! तू त्याची नग्नता पाहावी म्हणून आपला संतप्त क्रोध त्यात मिसळून त्याला मस्त करतोस.


शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे; तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही, त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढवली आहे. तो मृत्यूसारखा अतृप्त आहे, तो सर्व राष्ट्रांना आपणाजवळ जमा करतो, सर्व लोकांना आपल्यानजीक एकत्र करतो.”


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे.


चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे1 ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


मग अबीगईल नाबालाकडे गेली, तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता; ह्यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमीजास्त काही सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan