Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 दहा बिघे द्राक्षमळा दहा शेर रस देईल; एक मण बी एक पायली धान्य देईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 दहा एकर द्राक्षमळा एक बाथ रस देईल, आणि एक होमर बी केवळ एक एफा उपज देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ द्राक्षारस निघेल; एक होमेर बियाणे फक्त एक एफा धान्याचे पीक देईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:10
13 Iomraidhean Croise  

बोंडे व शाखा ही सर्व अखंड असून तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा केला.


माझ्या लोकांच्या भूमीवर काटेकुसळे उगवतील; ह्या उल्लासी नगराच्या सर्व आनंदमय घरांवरही ती उगवतील.


त्या दिवशी असे होईल की जेथे जेथे हजार रुपये किमतीचे हजार द्राक्षींचे वेल असत तेथे तेथे काटेकुटे होतील.


फळबागेतून, मवाब देशातून आनंद व हर्ष नाहीसा केलेला आहे; द्राक्षकुंडांत द्राक्षारस नाही असे मी केले आहे; हर्षनाद करून द्राक्षे कोणी तुडवणार नाही; हर्षनाद होईल तो द्राक्षे तुडवणार्‍यांचा नसणार.


ढेकळांखाली धान्यास बुरा चढला आहे, पेवे रिकामी पडली आहेत; कोठारे पडून गेली आहेत; कारण पिके बुडाली आहेत.


मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजतील आणि ती तुम्हांला तोलून परत देतील; ती खाऊन तुमची तृप्ती व्हायची नाही.


एखाद्याने आपल्या वतनाच्या शेताचा काही भाग परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करून वाहिला, तर त्यात बियाणे पडेल त्या मानाने तू त्याचे मोल ठरवावे; एक होमरभर जवाची पेरणी त्यात होत असली तर त्या शेताचे मोल पन्नास शेकेल रुपे ठरवावे.


तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो.


त्या सर्व दिवसांत कोणी वीस मापे धान्याच्या राशीकडे गेला तर त्याच्या हाती दहा लागत; द्राक्षकुंडांतून पन्नास पात्रे भरून काढण्यास गेला तर त्याला वीसच मिळत.


तू शेतात पुष्कळ बी घेऊन जाशील, पण थोडेच पीक गोळा करशील, कारण टोळ ते खाऊन टाकतील.


तू द्राक्षमळे लावून त्यांची मशागत करशील, पण तुला द्राक्षारस प्यायला मिळणार नाही आणि द्राक्षे खुडायलाही मिळणार नाहीत; कारण कीड ती खाऊन टाकील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan