Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन; आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे. माझ्या प्रियाचा द्राक्षमळा अतिशय सुपीक डोंगरावर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 माझी ज्यांच्यावर प्रीती आहे त्यांच्या द्राक्षमळ्याबद्दल मी गीत गाईन: सुपीक डोंगराळ भागावर माझ्या प्रियाचा एक द्राक्षमळा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 5:1
23 Iomraidhean Croise  

दया व न्याय ह्यांविषयी मी गाईन; हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन,


माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे.


तुझ्या प्रिय जनांनी मुक्त व्हावे, म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक.


मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला; आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला.


माझा वल्लभ माझा, व मी त्याची; तो आपला कळप भुईकमळांत चारत आहे.


त्याची वाणी परम मधुर आहे; तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!


मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”


मी आपल्या वल्लभाची आहे, व माझा वल्लभ माझा आहे; तो आपला कळप भुईकमळांमध्ये चारतो.


बहुत मेंढपाळांनी माझ्या द्राक्षीच्या मळ्याची नासाडी केली आहे, त्यांनी माझे वतन पायाखाली तुडवले आहे, त्यांनी माझे रम्य वतन शुष्क जंगल केले आहे.


मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता अशी लावली, ती तू माझ्यासमोर विजातीय हीन जातीची द्राक्षलता अशी कशी झालीस?


“मानवपुत्रा, सर्व वृक्षांत द्राक्षलतेची काय श्रेष्ठता आहे? वनवृक्षांमध्ये जी द्राक्षांची फांदी होती ती काय अधिक आहे?


तुझी आई तुझ्या द्राक्षमळ्यात जलाजवळ लावलेल्या द्राक्षवेलीसारखी होती; जलाच्या विपुलतेने ती सफळ होऊन तिला पुष्कळ पांगोरे फुटले.


इस्राएल उफाड्याने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे, त्याला भरपूर फळे येतात; जो जो त्याला जास्त फळे आली तो तो त्याने जास्त वेद्या केल्या; त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले.


आणखी एक दाखला ऐकून घ्या : कोणीएक गृहस्थ होता, ‘त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला’ आणि तो माळ्यांना खंडाने लावून देऊन आपण परदेशी गेला.


मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याच्याभोवती कुंपण घातले, द्राक्षारसासाठी कुंड खणले, माळा बांधला, आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला.


मग तो लोकांना हा दाखला सांगू लागला, कोणाएका मनुष्याने ‘द्राक्षमळा लावला’ आणि तो मळेकर्‍यांना सोपवून देऊन आपण बरेच दिवस दुसरीकडे जाऊन राहिला.


मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे.


तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील.


कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे; खोर्‍यात व डोंगरात उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan