Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 49:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तू बंदीत असलेल्यांना म्हणावे, ‘बाहेर या;’ अंधारात आहेत त्यांना म्हणावे ‘उजेडात या.’ ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांना चारा मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांस तू म्हणशील अंधारातून बाहेर या व तुम्ही आपणास प्रकट करा. ते मार्गात चरतील आणि सर्व उघड्या टेकड्या त्यांची कुरणे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 बंदिवानांना ‘बाहेर निघा,’ असे म्हणावे आणि जे अंधारात आहेत, त्यांना म्हणावे, ‘स्वतंत्र व्हा!’ “ते रस्त्याच्या काठावर चरतील आणि प्रत्येक नापीक टेकड्यांवर त्यांना गवत सापडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 49:9
37 Iomraidhean Croise  

बंदिवानांचे उसासे ऐकले, ज्यांचे मरण ठरले होते त्यांना सोडवले;


तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो; भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.


दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील; परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील; तुम्ही चिरंजीव असा.


कारण परमेश्वर दरिद्र्यांचे ऐकतो; बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही.


मी उजाड टेकड्यांवर नद्या व खोल दर्‍यांतून झरे वाहवीन; मी अरण्य पाण्याचे तळे व निर्जल प्रदेश झरे करीन.


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना व अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन.


परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.


येथे कोकरे आपले कुरण समजून चरतील, धष्टपुष्टांच्या ओसाड झालेल्या जागा परके खाऊन टाकतील.


प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;


ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;


अंधकारात चालणार्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्‍यांवर प्रकाश पडला आहे.


त्यांच्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यांना चारीन; तो कोण तर माझा सेवक दावीद; तो त्यांना चारील; तो त्यांचा मेंढपाळ होईल.


मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, म्हणजे पुनरपि त्यांच्या देशावर दुष्काळ येऊन त्यांचा र्‍हास होणार नाही; त्यांना पुन्हा परराष्ट्रीय लोकांकडून अप्रतिष्ठा सोसावी लागणार नाही.


त्या दिवशी असे होईल की, पर्वतावरून नवा द्राक्षारस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, व यहूदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील; परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल तो शिट्टीमाच्या खोर्‍यास पाणी पुरवील.


अशा प्रकारे त्याची सुटका झाली नाही तर योबेलवर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याची सुटका होईल.


तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल.


‘ह्यासाठी की, त्याने अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा,’ आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावेत.”


ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.”


“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, [भग्नहृदयी जनांस बरे करण्यास] त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे;


मी दार आहे. माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल.


पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’


म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2


कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;


त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानांवरून मिरवत नेले, त्याने शेतात उपज खाल्ला; त्याने त्याला खडकातील मध, आणि गारेच्या खडकातील तेल चाटवले;


त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan