Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 49:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला व जो माझा देव माझे सामर्थ्य झाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि आता, तो परमेश्वर म्हणतो, ज्याने मला त्याचा सेवक व्हावा म्हणून जन्मापासून घडवले आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याच्याजवळ परत आणावे, मी परमेश्वराच्या दृष्टीत सन्मान पावलो आहे, आणि माझा देव माझे बळ झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि आता याहवेह म्हणतात— याकोबाला त्यांच्याकडे परत आणावे व इस्राएलला स्वतःसाठी एकत्र करावे, यासाठी त्यांचा सेवक व्हावा म्हणून ज्याची गर्भाशयातच घडण केली, आणि हे काम देऊन माझा बहुमान केला व माझे परमेश्वर माझे सामर्थ्य आहेत—

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 49:5
30 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”


तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील, व पृथ्वीच्या चार्‍ही दिशांकडून इस्राएलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहूदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील.


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस; मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन कारण तू आश्‍चर्यकारक कृत्ये केली आहेस; तू आपले पुरातन संकल्प पूर्ण सत्त्वशीलतेने सिद्धीस नेले आहेत.


त्या दिवशी असे होईल की फरात नदाच्या प्रवाहापासून तो मिसरी ओहोळापर्यंत परमेश्वर मळणी करील, आणि इस्राएल लोकांनो, तुम्हांला एकएक असे वेचतील.


तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जिवाबद्दल राष्ट्रे मी देईन.


परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व साहाय्यकर्ता असे म्हणतो; हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या यशुरूना, भिऊ नकोस.


द्वीपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या; मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले; मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले.


शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो.


पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अत्युच्च होईल.


घालवून दिलेल्या इस्राएल लोकांस एकत्र करणार्‍या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की एकत्र केलेल्या इस्राएलांखेरीज इतरांनाही एकत्र करून मी त्यांच्यात मिळवीन.”


“मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”


तोच परमेश्वराचे मंदिर बांधील; तो वैभवशाली होईल; तो आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील; तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल; ह्या दोहोंत शांततेची सल्लामसलत होईल.”’


माझ्या पित्याने माझ्या हाती सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.


त्याने उत्तर दिले, “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.”


तो बोलत आहे इतक्यात, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;’ ह्याचे तुम्ही ऐका.”


यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’


“जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.


पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.


येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभू आहे) ह्याच्या द्वारे देवाने ‘शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्राएलाच्या’ संततीस पाठवले ते हे.


कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्‍चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”


तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी; तेव्हा मानवांची2 मसलत न घेता,


तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan