Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 49:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 परमेश्वर म्हणतो, “हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणार्‍याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 पण परमेश्वर असे म्हणतो, होय, बंदिवान योद्धांकडून काढून घेण्यात येतील, आणि लूटलेले सोडवले जातील. कारण मी तुझ्या शत्रूंचा विरोध करीन, आणि तुझ्या मुलांना वाचविल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 परंतु याहवेह हे असे म्हणतात: “होय, योद्ध्याच्या हातून बंदिवान सोडविले जातील, व अत्याचारीकडून लूट हिसकावून घेतली जाईल; तुमच्याशी झगडणाऱ्यांशी मी झगडेन, आणि मी तुमच्या मुलांना वाचवेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 49:25
39 Iomraidhean Croise  

तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”


हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.


त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल” आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल.


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


विदेशी लोक त्यांना नेऊन स्वस्थानी पोचवतील; आणि इस्राएलाचे घराणे परमेश्वराच्या भूमीत त्यांना दासदासी करून ठेवील; ज्यांनी त्यांना बंदिवान करून नेले होते त्यांना ते बंदीत ठेवतील; असे ते आपणांस पिडणार्‍यांवर स्वामित्व करतील.


ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील; आपणांवर जुलूम करणार्‍यांमुळे लोक परमेश्वराचा धावा करतील तेव्हा तो एक उद्धारक व कैवारी पाठवून त्यांना मुक्त करील.


कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्‍या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास.


त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”


कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.


घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.


यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.


ते सिंहासारखी गर्जना करीत आहेत; ते तरुण सिंहाप्रमाणे गुरगुरत आहेत व गुरगुरून शिकार पकडत आहेत; ते ती घेऊन जात आहेत, कोणी सोडवत नाहीत.


दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो, तो मरणार नाही, गर्तेत पडणार नाही. त्याला अन्नाची वाण पडणार नाही.


तुझा प्रभू परमेश्वर, आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, “पाहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो; ह्यापुढे तू तो पिणार नाहीस;


तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.


मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्का-र्‍यांच्या तावडीतून मुक्त करीन.”


परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हांला ह्या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन.


कारण परमेश्वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून मुक्त केले आहे.


अशा प्रकारे त्याची सुटका झाली नाही तर योबेलवर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याची सुटका होईल.


पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल, तुझ्या तरुण सिंहांना तलवार नष्ट करील; मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन, तुझ्या जासुदांचा शब्द ह्यापुढे ऐकू येणार नाही.


तेव्हा ज्या राष्ट्रांनी यरुशलेमेबरोबर लढाई चालवली त्या सर्वांचा संहार परमेश्वर ज्या मरीने करील ती ही : ते पायांवर उभे असता त्यांचे मांस कुजेल, त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल.


तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल; पूर्वी युद्धाच्या दिवशी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील.


तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन.


बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही; त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.


वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.


पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan