Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 49:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 वीरांकडून लूट हिसकावून घेता येईल काय? पकडून नेलेल्या नीतिमान जनांची सुटका होईल काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 वीर योद्धा पासून लूट हिसकून घेतील काय? अथलाल जूलमी राजाकडे कायद्याने बंदी असलेले सोडले जातील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 योद्ध्याच्या हातून लूट घेता येईल काय? किंवा अत्याचारीकडून नीतिमान बंदिवानांना सोडविता येईल काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 49:24
17 Iomraidhean Croise  

आमच्या दुष्कृत्यांमुळे व आमच्या मोठ्या अपराधांमुळे हे सर्व आमच्यावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून, हे देवा, तू आम्हांला कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकांना वाचवून अवशेष ठेवले,


आम्ही दास तर आहोत, तरी आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही; उलट त्याने पारसदेशीय राजाच्या द्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, ह्यासाठी की आम्ही नवजीवन पावून आमच्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावी, आणि यहूदा व यरुशलेम ह्यांत आम्हांला आश्रयस्थान मिळावे.


आमच्यावर जे काही गुदरले आहे त्याच्या बाबतीत तू न्यायशील आहेस; तू आमच्याशी सत्यतेने वागलास पण आम्ही दुष्टाई केली आहे.


आमच्या पापांमुळे जे राजे तू आमच्यावर नेमले आहेत त्यांना ह्या देशाचे पुष्कळ उत्पन्न मिळत आहे; ते आमच्या देहांवर व आमच्या गुराढोरांवर हवी तशी सत्ता चालवत आहेत; आम्ही फार फार संकटात आहोत.”


तरी हे लुटलेले, नागवलेले लोक आहेत; ते सर्व गर्तांच्या पाशात सापडले आहेत, कारागृहात कोंडले आहेत; ते भक्ष्य झाले आहेत, त्यांना सोडवणारा कोणी नाही; ते लूट झाले आहेत, आणि “ती परत द्या” असे म्हणणारा कोणी नाही.


ते सिंहासारखी गर्जना करीत आहेत; ते तरुण सिंहाप्रमाणे गुरगुरत आहेत व गुरगुरून शिकार पकडत आहेत; ते ती घेऊन जात आहेत, कोणी सोडवत नाहीत.


ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल; कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.


तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय; पाहा, ते म्हणतात, ‘आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे;’


मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय?” मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक.”


पाहा, मी तुझ्यावर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल, तुझ्या तरुण सिंहांना तलवार नष्ट करील; मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन, तुझ्या जासुदांचा शब्द ह्यापुढे ऐकू येणार नाही.


अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील.


बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही; त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan