Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 49:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 राजे बापासमान तुझे पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील; ती तुला भूमीपर्यंत लवून नमन करतील. तुझ्या पायांची धूळ चाटतील; तेव्हा मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे फजीत होत नाहीत, असे तुला कळून येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 राजे तुझे संगोपण करणारे बाप होतील, आणि त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील. ते भूमीकडे तोंड लववून, तुझ्यापुढे वाकून तुला नमन करतील आणि ते तुझ्या पायाची धूळ चाटतील, आणि मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे, जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते लाजवले जाणार नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 राजे तुला उपपित्यासमान होतील, व त्यांच्या राण्या तुला उपमातेसमान होतील. ती तुझ्यासमोर भुईपर्यंत लवून मुजरा करतील; आणि तुझी पायधूळ चाटतील. तेव्हा मीच याहवेह आहे, हे तुला समजेल. माझ्यावर आशा ठेवणारा, कधीच निराश होणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 49:23
45 Iomraidhean Croise  

लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.


योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर भेट आणली होती, ती घरात आणून त्याच्यापुढे ठेवली आणि त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला.


हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकारस्मरण करतील; कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत.


तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात.


परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.


मिसर देशातून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील.


हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतीक्षा करतात त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये; हे इस्राएलाच्या देवा, जे तुझा शोध करतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.


मी तुम्हांला आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन; म्हणजे तुम्हांला मिसरी लोकांच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हांला कळेल.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


विदेशी लोक त्यांना नेऊन स्वस्थानी पोचवतील; आणि इस्राएलाचे घराणे परमेश्वराच्या भूमीत त्यांना दासदासी करून ठेवील; ज्यांनी त्यांना बंदिवान करून नेले होते त्यांना ते बंदीत ठेवतील; असे ते आपणांस पिडणार्‍यांवर स्वामित्व करतील.


त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”


हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करीत आहोत; तुझ्या नामाची व तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जिवास लागून राहिली आहे.


म्हणून अब्राहामाचा उद्धारकर्ता परमेश्वर याकोबाच्या घराण्याविषयी म्हणतो, “ह्यापुढे याकोब लज्जायमान होणार नाही व त्याचा चेहरा फिका पडणार नाही.


येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की, परमेश्वराच्या हातून हे झाले आहे; इस्राएलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे.


परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “तुम्ही मला ओळखावे, माझ्यावर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हांला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात, तू माझा निवडलेला सेवक आहेस.


परमेश्वर असे म्हणतो, “मिसराच्या श्रमाचे फळ, कूशाची कमाई व धिप्पाड सबाई लोक तुझ्याजवळ येऊन तुझे होतील; ते तुझ्यामागून येतील; बेड्या घातलेले येतील, तुला दंडवत घालतील. ते तुला विनंती करून म्हणतील की : ‘खरोखर तुझ्याजवळ देव आहे, दुसरा कोणी नाही, दुसरा कोणीच देव नाही.”’


इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही.


ज्याला माणसे तुच्छ लेखतात, ज्याला लोक अमंगल मानतात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, “राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल.”


प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही; मी आपले तोंड गारगोटीसारखे केले; माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते.


त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील;2 राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.


म्हणून माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख होईल, आणि मग मी तुमच्याजवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे असे ते त्या दिवशी जाणतील.”


तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.


तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील, राजांचे स्तन तू चोखशील, आणि मी परमेश्वर तुला तारणकर्ता, उद्धारकर्ता याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे तू जाणशील.


राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.


राष्ट्रे तुझी नीतिमत्ता पाहतील, सर्व राजे तुझे वैभव पाहतील; परमेश्वराच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील.


हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही.


मी तुम्हांला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”


तुम्ही समजाल की इस्राएल लोकांमध्ये मी आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे; अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजीत होणार नाही.


ती सर्पाप्रमाणे धूळ चाटतील, पृथ्वीवरील सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे ती आपल्या विवरांतून थरथर कापत बाहेर येतील, परमेश्वर आमचा देव ह्याच्याकडे ती भयकंपित होऊन येतील; ती तुझ्यापुढे भयभीत होतील.


मी ह्या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे काय? ह्यांना मी प्रसवलो आहे काय? ‘जो देश ह्यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देऊ केला आहेस, त्या देशाकडे, तान्ह्या बाळाला सांभाळून नेणार्‍या पालक-पित्याप्रमाणे मी ह्यांना उराशी धरून घेऊन जावे’ असे तू मला कसे सांगतोस?


ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले.


कारण शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजीत होणार नाही.’


आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.


त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाही.”


कारण असा शास्त्रलेख आहे : “पाहा, निवडलेली, मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनेत बसवतो; तिच्यावर विश्वास ठेवणारा फजीत होणार नाही.”


पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan