यशायाह 49:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आपले डोळे वर कर, चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जिवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांना अलंकाराप्रमाणे लेशील; नववधूप्रमाणे तू त्यांना आपल्या अंगावर घालशील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तू आपल्या सभोवती नजर टाक आणि पाहा, ते सर्व एकत्र गोळा होऊन, तुझ्या कडे येतील. परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, खचित तू त्यांना दागिण्यांप्रमाणे आपल्या वर घालशील, एका नवरी सारखे तू त्यांना आपणावर घालशील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुमची नजर वर उचला आणि सभोवती पाहा; तुमची सर्व संतती एकत्र येऊन तुमच्याकडे परत येतील. मी जिवंत आहे,” याहवेह घोषणा करतात, “तुम्ही त्यांना आभूषणाप्रमाणे अंगावर धारण कराल, वधूप्रमाणे तुम्ही त्यांना परिधान कराल. Faic an caibideil |