Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 49:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तुझी मुले त्वरेने येत आहेत; तुझा नाश करणारे तुला उजाड करणारे तुझ्यातून निघून जात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तुझी मुले त्वरा करीत आहेत, ज्यांनी तुझा नाश केला आहे, ते दूर जात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तुमची संतती घाईघाईने परत येईल, आणि तुम्हाला उजाड करणारे तुम्हाला सोडून निघून जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 49:17
14 Iomraidhean Croise  

तेव्हा यरुशलेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जाण्यास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहूदा व बन्यामीन ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक व लेवी उठून सिद्ध झाले.


मग मी त्यांना म्हणालो, “आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हांला दिसतच आहे; यरुशलेम उजाड झाले आहे, व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत; तर चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू म्हणजे ह्यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही.”


कारण तेथे आमचा पाडाव करणार्‍यांनी आम्हांला गाणी गायला सांगितले आमचा छळ करणार्‍यांनी आम्हांला त्यांची करमणूक करण्यास सांगितले. ते म्हणाले, “आम्हांला सीयोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा.”


मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन.


हे परमेश्वरा, खरोखर अश्शूरच्या राजांनी सर्व देश व त्यांतली जमीन ओसाड केली आहे,


तुझी उजाड व ओसाड स्थळे व तुझी उद्ध्वस्त भूमी ह्यांविषयी म्हणशील तर तुझ्या ठायी वस्तीला जागा पुरणार नाही; तुला ग्रासून टाकणारे दूर गेले आहेत.


आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस? जुलूम करणारा तुझा नाश करण्यास पाहत आहे म्हणून त्याच्या क्रोधास सारा दिवस एकसारखी का भितेस? जुलम्याचा क्रोध उरला आहे कोठे?


तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत.


कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.


त्यानंतर इस्राएल घराण्याच्या आसपासच्या द्वेष्ट्यांपैकी कोणी त्यांना बोचणारा कांटा व टोचणारी नांगी असे उरणार नाही; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


मी तुमच्यावर माणसांची, इस्राएलाच्या एकंदर सर्व घराण्याची संख्या वाढवीन; नगरे वसतील; पडीत स्थळे बांधून काढतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan