Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 49:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ह्यावर सीयोन म्हणाली, “परमेश्वराने माझा त्याग केला आहे; प्रभू मला विसरला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभू मला विसरला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे; प्रभू आम्हाला विसरले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 49:14
14 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार?


माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस.


मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास.


हे याकोबा, असे का म्हणतोस, हे इस्राएला, असे का बोलतोस की, “माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टिआड झाला आहे?”


हे आकाशा जयजयकार कर; हे पृथ्वी, आनंद कर; अहो पर्वतांनो, जयघोष करा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे.


“स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.


सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो.


त्या अर्थी पाहा, मी तुम्हांला अगदी विसरेन, मी तुम्हांला आणि जे नगर तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिले त्याला माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन;


परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले; तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.


तू आम्हांला सर्वकाळ का विसरतोस? तू आम्हांला दीर्घकाळ का सोडून देतोस?


हे मानवपुत्रा, तू इस्राएल घराण्यास सांग, तुम्ही म्हणता की, ‘आमचे अपराध व आमची पापे ह्यांचा भार आमच्यावर आहे व त्यामुळे आम्ही क्षय पावत आहोत, आम्ही कसे जगणार?’


Lean sinn:

Sanasan


Sanasan