Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 48:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तू हे ऐकले आहेस, हे सर्व पाहा, तुम्हांला हे कबूल करायला नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहीत नाहीत अशा गोष्टी तुला ऐकवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तू या गोष्टी बद्दल ऐकले; हे सर्व पुरावे पहा; आणि तू, मी जे काही बोललो ते खरे आहे का ते मान्य नाही करणार? आतापासून मी तुला नव्या गोष्टी, माहीत नसलेल्या गोष्टी दाखवील्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा. ती तुम्ही स्वीकारीत नाही का? “यापुढे मी तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या नव्या गोष्टी सांगतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 48:6
29 Iomraidhean Croise  

मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करतो.


हे माझ्या झोडलेल्या आणि खळ्यातल्या धान्या, इस्राएलाचा देव, सेनाधीश परमेश्वर, ह्याच्याकडून जे मी ऐकले ते मी तुम्हांला कळवले आहे.


तू बहुत पाहिले आहे ते ध्यानात ठेवत नाहीस; त्याचे कान उघडे आहेत पण तो ऐकत नाही.


मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्‍यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही.


पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.”


पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.


त्या आताच उद्भवल्या, फार मागे नाहीत; त्या तुला आजपर्यंत ठाऊक नव्हत्या, नाही तर तू म्हणतास, ‘पाहा, त्या मला आधीच ठाऊक होत्या.’


अहो, ह्या पिढीचे लोकहो! तुम्ही परमेश्वराचे वचन लक्षात आणा; मी इस्राएलास वैराण, निबिड काळोखाचे स्थळ असा झालो आहे काय? ‘आम्ही मोकाट झालो आहोत, ह्यापुढे आम्ही तुझ्याकडे येणार नाही’, असे माझे लोक का म्हणतात?


मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन.


“राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


परमेश्वर ह्या नगरास हाक मारीत आहे; जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो - “तुम्ही दंडाचे व तो नेमणार्‍याचे ऐका.


जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून घोषित करा.


मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.


परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”


हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, “डोळ्यानहले नाही, कानाने जे ऐकले ने नाही व माणसाच्या ‘मनात जे अले नाही, ते आपणावर प्रीत करणार्‍यांसाठी देवाने सिद्ध केल आहे;”


म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव;


ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणार्‍या ‘कर्ण्याच्या’ ध्वनीसारखी होती; ती म्हणाली, “इकडे ‘वर ये’ म्हणजे ‘ज्या गोष्टी’ ह्यानंतर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या मी तुला दाखवीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan