Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 48:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 म्हणून हे बहुत काळापूर्वीच तुला कळवले. ते घडण्यापूर्वीच तुला विदित केले; नाहीतर तू म्हणाला असतास की ‘माझ्या मूर्तीने ते केले; माझ्या कोरीव मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या ओतीव मूर्तीच्या आज्ञेने ते झाले.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 यास्तव मी तुला या गोष्टी आधीच घोषीत केल्या, त्या घडण्या अगोदरच मी तुला सांगितले, जेणेकरून तू असे म्हणू नये की, माझ्या मूर्तीने ती कृत्ये केली, आणि माझ्या कोरीव मूर्तीने व माझ्या ओतीव मूर्तीने ती आज्ञापिले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या; प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या, जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही, ‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले; आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 48:5
10 Iomraidhean Croise  

पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.


मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली तेव्हापासून माझ्यासारखा संदेश प्रकट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व माझ्यापुढे प्रतिपादन करावे; त्यांनी भावी गोष्टी व आता होणार्‍या गोष्टी सांगाव्यात.


भयभीत होऊ नका, थरथर कापू नका; मी मागेच तुला हे ऐकवले आहे व कळवले की नाही? तुम्ही माझे साक्षी आहात, माझ्यावेगळा कोणी देव आहे काय? माझ्यावेगळा कोणी दुर्ग नाही; मला कोणी ठाऊक नाही.”


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्‍या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’


“मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या.


हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते;’


हे जे त्याला युगादिपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan