Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 48:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 “मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 “मी काळापूर्वीच या गोष्टी जाहीर केल्या आहेत, त्या माझ्या मुखातून निघाल्या आणि मीच त्या कळविल्या. मी त्या अचानक करु लागलो, आणि त्या घडून आल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 भावी काळात काय घडणार याबद्दल भविष्यवाणी मी फार पूर्वी केलेली आहे मी माझ्या मुखाने ते घोषित करून जाहीर केले; मग अकस्मात मी ते प्रत्यक्ष केले व तसे घडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 48:3
16 Iomraidhean Croise  

तरी तुझ्या शत्रूंचा समुदाय रजःकणांसारखा होईल, तुला पिडणार्‍यांचा समुदाय उडणार्‍या भुसासारखा होईल; हे एका क्षणात, एकाएकी घडेल.


म्हणून एकाएकी कोसळून पडणार्‍या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हांला अकस्मात फळ मिळेल;


माझ्यावरल्या तुझ्या संतापामुळे व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे मी तुझ्या नाकात माझी वेसण व तुझ्या तोंडात माझा लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.’


पाहा, मी त्याला अशी काही प्रेरणा देईन की तो कसली तरी अफवा ऐकून आपल्या देशास परत जाईल व आपल्याच देशात तो तलवारीने पडेल, असे मी करीन.”’


ते आणा व पुढे काय घडणार ते आम्हांला कळवा; प्रथम घडणार्‍या गोष्टी कोणत्या ते सांगा, म्हणजे त्यांचा आम्ही विचार करू व त्यांचा अखेर परिणाम काय होतो तो पाहू; अथवा पुढे होणार्‍या गोष्टी आम्हांला ऐकवा.


मीच प्रथम सीयोनेस म्हणालो, “हे पाहा, मी यरुशलेमेसाठी सुवार्तिक नेमला आहे.”


पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.”


सर्व राष्ट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत; अशा गोष्टी त्यांतला कोण सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हांला ऐकवाव्यात; त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावेत; त्यांनी ते ऐकून म्हणावे की हे खरे आहे.


बोला, त्यांना समोर आणा; त्यांना आपापसांत विचार करू द्या; हे कोणी पूर्वीपासून कळवले? हे कोणी पुरातन काळापासून ऐकवले? मी परमेश्वरानेच नव्हे काय? माझ्यावेगळा देव नाही; माझ्यावाचून न्यायी व तारणकर्ता दुसरा कोणी देव नाही.


परमेश्वराने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan