Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 48:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तुम्ही सर्व जमा व्हा, ऐका; त्या मूर्तींपैकी कोणी ह्या गोष्टी कळवल्या? परमेश्वराला प्रिय असलेला मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे बाबेलचे करील; तो आपले भुजबल खास्द्यांवर चालवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुम्ही सर्व एकत्र या आणि माझे ऐका. ज्या कोणी तुमच्या मध्ये कोणी या गोष्टी सांगितल्या? परमेश्वराची सहमती, त्याचा बाबेलविरूद्ध असणारा हेतू साध्य करीन. तो खास्द्यांविरूद्ध परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका: तुमच्या कोणत्या मूर्तीने तुम्हाला हे भविष्य सांगितले होते? याहवेहचा निवडलेला मित्र बाबेलच्या विरुद्ध त्यांचे हेतू साध्य करेल; बाबेलवर ते त्यांचा हात उगारतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 48:14
17 Iomraidhean Croise  

मग याकोबाने आपल्या मुलांना बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व एकत्र जमून या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हांला सांगतो.


याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका; तुमचा बाप इस्राएल ह्याच्याकडे कान द्या.


तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खास्दी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असा जो बाबेल त्याची, सदोम व गमोरा ह्यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी स्थिती होईल.


तर पाहा, पायदळ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत; ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडल्या.”


ते आणा व पुढे काय घडणार ते आम्हांला कळवा; प्रथम घडणार्‍या गोष्टी कोणत्या ते सांगा, म्हणजे त्यांचा आम्ही विचार करू व त्यांचा अखेर परिणाम काय होतो तो पाहू; अथवा पुढे होणार्‍या गोष्टी आम्हांला ऐकवा.


सर्व राष्ट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत; अशा गोष्टी त्यांतला कोण सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हांला ऐकवाव्यात; त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावेत; त्यांनी ते ऐकून म्हणावे की हे खरे आहे.


मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’


मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली तेव्हापासून माझ्यासारखा संदेश प्रकट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व माझ्यापुढे प्रतिपादन करावे; त्यांनी भावी गोष्टी व आता होणार्‍या गोष्टी सांगाव्यात.


मीच न्याय्य दृष्टीने कोरेशाची उठावणी केली; मी त्याचे सगळे मार्ग सरळ करीन; तो माझे नगर बांधील व काहीएक मोल अथवा मोबदला न घेता बंदिवान झालेल्या माझ्या लोकांना मुक्त करील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


पाहा, यार्देनेच्या घोर अरण्यातून जसा सिंह तसा तो त्या मजबूत वस्तीवर येईल; पण मी त्यांना त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन; ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?


येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, [वधस्तंभ घेऊन] माझ्यामागे ये.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan