Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 48:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्‍यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका तुम्ही जे इस्राएल या नावाने ओळखले जाता, आणि यहूदाह वंशावळीतून येता, तुम्ही जे याहवेहच्या नावाने शपथ घेता आणि इस्राएलाच्या परमेश्वराचा धावा करता— परंतु सत्यतेत किंवा नीतिमत्तेत नव्हे—

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 48:1
48 Iomraidhean Croise  

त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


देव त्याला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे; पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाहीत, तर तुझे नाव इस्राएल होईल.” आणि देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले.


ते आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे आजवर चालत आहेत; ते परमेश्वराचे भय बाळगत नाहीत; ते आपले स्वतःचे नियम व निर्णय पाळत नाहीत किंवा परमेश्वराने ज्यांना इस्राएल हे नाव दिले त्या याकोबाच्या वंशजांना परमेश्वराने विहित केलेले नियमशास्त्र व आज्ञा ह्यांप्रमाणेही चालत नाहीत.


इकडे देवाचा माणूस अलीशा ह्याचा चाकर गेहजी ह्याने विचार केला की, “अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली; परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्यामागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच.”


राजा देवाच्या ठायी हर्ष पावेल; जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करील; कारण असत्य बोलणार्‍यांचे तोंड बंद होईल.


देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.


“ज्यांचा उगम इस्राएलापासून आहे असे तुम्ही, प्रभू जो देव त्याचा जनसभांत धन्यवाद करा.”


तेथे त्यांच्यावर प्रभुत्व करणारा कनिष्ठ बन्यामीन, यहूदाचे अधिपती, व त्यांच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.


मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये.


तुझे झरे बाहेर वाहून जावेत काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वाहावेत काय?


हे आमच्या देवा, परमेश्वरा, तुझ्याहून अन्य सत्ताधीशांनी आमच्यावर सत्ता चालवली होती, पण तुझ्याच द्वारे आम्ही तुझे नाम स्तवतो.


तेव्हा कोणी म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे;’ कोणी याकोबाचे नाव घेईल; कोणी आपल्या हाताने मी परमेश्वराचा, असे लिहील आणि इस्राएल हे उपनाव घेईल.”


मी आपली शपथ वाहिली आहे; माझ्या न्याय्यत्वाच्या मुखातून वचन निघाले आहे, ते बदलणार नाही; ते हे की, ‘माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकील, प्रत्येक जिव्हा माझ्या ठायी निष्ठेची शपथ वाहील.’


नीतिमत्तेपासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांनो, माझे ऐका.


“तुम्ही जे नीतिमत्तेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका; ज्या खडकातून तुम्हांला खोदून काढले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हांला खणून काढले त्याकडे लक्ष द्या.


अब्राहाम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्यांच्याकडे लक्ष द्या; तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलावले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले.


ते तर रोजरोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात; नीतीचे आचरण करणार्‍या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणार्‍या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात; देवाची समीपता ते इच्छितात.


परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत;


आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


म्हणून देशातला जो आपणास धन्य म्हणवील तो सत्य देवाच्या नामाने आपणास तसा म्हणवील; देशातला जो शपथ वाहील तो ती सत्य देवाच्या नामाची वाहील; कारण पूर्वीच्या कष्टांचा विसर पडला आहे व ते माझ्या दृष्टिआड झाले आहेत.


आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”


तरीपण यहूदातले जे सर्व तुम्ही मिसर देशात राहत आहात ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका : परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आपल्या थोर नामाची शपथ वाहिली आहे की अखिल मिसर देशात, ‘परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणायला माझे नाम यहूदातल्या माणसांपैकी कोणाच्या मुखातून निघणार नाही.


“परमेश्वराच्या जीविताची शपथ,” असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे.


माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, मी परमेश्वर आहे.


अहो, ज्यांना याकोबाच्या घराण्यातले म्हणतात, ते तुम्ही लोकहो, परमेश्वराचा आत्मा कमी सहनशील आहे काय? ही त्याची कृत्ये आहेत काय? माझी वचने सरळपणे वागण्यार्‍यांचे बरे करत नाहीत काय?


जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही1 शपथ वाहतात,


तो मला म्हणाला, “ह्या सर्व देशाला प्राप्त होणारा शाप तो हा पट आहे; चोरी करणार्‍या सर्वांना ह्या लेखानुसार एका बाजूने घालवतील व खोटी शपथ वाहणार्‍या सर्वांना ह्या लेखानुसार दुसर्‍या बाजूने घालवतील.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


त्याच्या मोटेतून पाणी वाहील. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल; त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्या ठायी कपट नाही!”


देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”


आता जर तू स्वतःला यहूदी म्हणवत आहेस, आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस,


तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही.


म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात.


आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.


इस्राएल सुरक्षित राहतो; धान्य व द्राक्षारस ह्यांनी समृद्ध अशा प्रदेशी याकोबाचा झरा अलग उफाळत आहे, आणि त्याच्यावरचे आकाश दहिवर वर्षते.


तुम्ही मला असे सांगत असताना परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले; आणि परमेश्वर मला म्हणाला, ‘ह्या लोकांचे तुझ्याशी झालेले बोलणे मी ऐकले आहे; त्यांनी जे काही म्हटले ते बरोबर म्हटले.


तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.


ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्‍या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील;


(तुझी कृत्ये,) तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे (तरी तू धनवान आहेस) आणि जे यहूदी नसताही स्वतःला यहूदी म्हणवतात, पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे.


पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan