Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 47:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी, एकाच क्षणी तुला प्राप्त होतील; तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके ह्यांना न जुमानता ती तुझ्यावर पूर्णपणे गुदरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 परंतु अपत्यहीनता व विधवापण या दोन्ही गोष्टी एका दिवशी एका क्षणात तुझ्यावर येतील; तुझे जादूटोणा आणि पुष्कळ मंत्रतंत्र व ताईत यांना न जुमानता तुजवर जोराने येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पण आता या दोन्ही आपत्ती तुझ्यावर त्याच क्षणी, एकाच दिवशी, पूर्णपणे गुदरतील: तू विधवा होशील आणि तुझी मुलेही गमावशील. येथे तुझे अनेक चेटके आणि तुझा सर्व जादूटोणा असूनही हे सर्व पूर्ण मापाने भरून तुझ्यावर पडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 47:9
26 Iomraidhean Croise  

एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत;


त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारतील; त्यांची घरे लुटतील; त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील.


तर पाहा, पायदळ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत; ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडल्या.”


ह्यामुळे मंत्रतंत्रांनी निवारता येणार नाही अशी विपत्ती तुझ्यावर येईल; खंडणी देऊन टाळता येणार नाही असे अरिष्ट तुझ्यावर येईल; तुझ्या ध्यानीमनी नाही असा नाश तुला एकाएकी गाठील.


सातपुती म्लान झाली आहे; ती प्राण सोडत आहे; भरदिवसा तिचा सूर्य मावळत आहे; ती लज्जित व फजीत होत आहे; त्यांचा अवशेष त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन, असे परमेश्वर म्हणतो.”


पृथ्वी कापत आहे, वेदना पावत आहे; कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे संकेत पूर्ण होत आहेत.


तेव्हा राजाने हुकूम केला की, ‘माझी स्वप्ने काय आहेत ते सांगायला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार व खास्दी ह्यांना बोलावून आणा.’ मग ते सर्व राजासमोर हजर झाले.


तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ हे आत आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्यापुढे मांडले; पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही.


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की, “मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ ह्यांना घेऊन या.” राजा त्या बाबेलच्या ज्ञान्यांस म्हणाला, “जो कोणी हा लेख वाचील व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतींतला एक होईल.”


सुरूप व चेटकात निपुण अशा त्या वेश्येच्या बहुत व्यभिचारांमुळे हे घडले आहे; ती आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांचा, आपल्या चेटकांनी वंशांचा विक्रय करते.


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे.


नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले; ह्याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे व आपला पती ह्यांना अंतरली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan