Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 47:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अगे विलासिनी, जी तू निश्‍चिंत बसतेस व मनात म्हणतेस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही, मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही,” ती तू हे ऐक :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस, जी तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणीच नाही; मी कधीच विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमवल्याचा अनुभव कधी येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “अगे चैनबाजीचे वेड असणारी, सुरक्षितपणे विलासणारी, आणि स्वतःला म्हणणारी, ‘मीच आहे, माझ्यासारखे कोणीही नाही. मी कधीही विधवा होणार नाही माझी लेकरे मी कधी गमावणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 47:8
36 Iomraidhean Croise  

मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन;’


सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, थरथर कापा, निश्‍चिंत असणार्‍यांनो, घाबर्‍या व्हा, वस्त्रे फेडा, उघड्या होऊन, कंबरेस गोणपाट गुंडाळा.


अहो सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, उठा, माझी वाणी ऐका; अहो निश्‍चिंत कन्यांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या.


आकाशाचा उत्पन्नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली; हा परमेश्वर म्हणतो, “मीच परमेश्वर आहे; अन्य कोणी नव्हे.


मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले,


येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्यावेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही.


कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवलीस; तू म्हणालीस, “कोणी मला पाहत नाही;” तुझे शहाणपण व तुझे ज्ञान ह्यांनी तुला बहकवले म्हणून तू आपल्या मनात म्हणालीस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही.”


“उठा! स्वस्थ व बेफिकीर राहणार्‍या राष्ट्रावर चढाई करा, असे परमेश्वर म्हणतो; त्याला वेशी किंवा अडसर नाहीत, ते एकीकडे राहतात.


माझे वतन लुटणार्‍यांनो, तुम्ही जरी हर्ष व उल्लास करीत आहात, मळणी करणार्‍या कालवडीप्रमाणे बागडत आहात, मजबूत घोड्यांप्रमाणे खिंकाळत आहात,


बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या तरी माझ्याकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो.


पाहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते : गर्व, अन्नाची विपुलता व ऐषआराम ही तिला व तिच्या कन्यांना होती; दरिद्री व गरजवंत ह्यांना तिने हात दिला नाही.


“मानवपुत्रा, सोरेच्या अधिपतीस सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस, ‘मी देव आहे, भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे;’ पण तू देव नव्हेस, मानव आहेस; आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव आणतोस;


त्या दिवशी त्या निश्‍चिंत कूशी लोकांना घाबरवून सोडण्यासाठी माझ्याकडील जासूद जहाजात बसून जातील; मिसरावर प्रसंग आला तेव्हाच्याप्रमाणे त्यांना वेदना होतील; कारण पाहा, तो प्रसंग येत आहे.


तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.


महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे.


म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


मी नबुखद्नेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो.


तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस;


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


ते गुंतागुंत झालेल्या काटेर्‍यांसारखे असले, ते द्राक्षारसाने मस्त झालेल्यांप्रमाणे असले, तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.


सुरूप व चेटकात निपुण अशा त्या वेश्येच्या बहुत व्यभिचारांमुळे हे घडले आहे; ती आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांचा, आपल्या चेटकांनी वंशांचा विक्रय करते.


ते दारुण व भयंकर आहेत; त्यांचा न्याय व त्यांचे वैभव त्यांचे स्वत:चेच आहे.


हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.


तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.


मीखाने बनवलेल्या वस्तू व त्याचा पुरोहित बरोबर घेऊन ते लईश येथे आले. तेथील लोक शांत व निश्‍चिंत राहत होते. त्यांना त्यांनी तलवारीने मारून त्यांचे नगर जाळून टाकले.


मग ते पाच पुरुष निघून लईश येथे गेले. तेथे त्यांना असे दिसून आले की, तेथील लोक सीदोनी लोकांप्रमाणे शांत व निश्‍चिंत आहेत; अन्नधान्याची त्यांना मुळीच वाण नसून ते धनवान आहेत; ते सीदोनी लोकांपासून दूर राहत असून अरामी लोकांशी त्यांचा काही संबंध नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan