Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 47:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जाते घेऊन धान्य दळ, आपला बुरखा मागे सार, वस्त्राचा घोळ उचलून धर, मांड्या उघड्या करून नदीनाल्यांतून पार चालत जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जाते घे आणि पीठ दळ; तुझा बुरखा काढ, तुझ्या झग्याचा घोळ काढून टाक, तुझे पाय उघडे कर, नद्या ओलांडून जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जाते घेऊन धान्य दळीत बस; तुझा बुरखा काढून टाक. तुझ्या घागर्‍याचा घोळ उचल आणि पाय उघडे करून ओढ्यातून पायपीट करत जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 47:2
22 Iomraidhean Croise  

तिने त्या सेवकाला विचारले, “हा रानात आपल्याला सामोरा येत आहे तो कोण?” सेवक म्हणाला, “हा माझा धनी.” तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले.


तेव्हा हानूनाने दाविदाच्या चाकरांना पकडून त्यांचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यांना घालवून दिले.


तर माझी स्त्री दुसर्‍याचे दळणकांडण करो; परके तिला ओणवी करोत.


तेव्हा मिसराच्या सिंहासनावर बसणार्‍या फारोपासून ते जात्यावर बसणार्‍या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथमवत्स मरतील.


जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील; पक्ष्याच्या शब्दानेदेखील त्याच्या निद्रेचा भंग होईल; सर्व गायनस्वर2 मंदावतील.


तसा अश्शूर देशाचा राजा मिसरातील बंदिवान व कूशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे ह्यांना उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी, मिसर देश फजीत व्हावा म्हणून घेऊन जाईल.


म्हणून प्रभू सीयोनेच्या कन्यांच्या माथ्यांवर खवडे उठवील व परमेश्वर त्यांची गुह्यांगे उघडी करील.


आरसे, मलमलीची वस्त्रे, दुपट्टे व ओढण्या ह्यांची शोभा नाहीशी करील.


सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, थरथर कापा, निश्‍चिंत असणार्‍यांनो, घाबर्‍या व्हा, वस्त्रे फेडा, उघड्या होऊन, कंबरेस गोणपाट गुंडाळा.


‘हे माझ्यावर का आले?’ असे आपल्या मनात म्हणशील तर तुझ्या मनस्वी दुष्कर्मामुळे तुझ्या अंगावरील वस्त्राचा पदर सारला आहे व तुझ्या टाचा जबरीने उघड्या केल्या आहेत.


म्हणून मी तुझे नेसण तुझ्या तोंडावर उडवीन म्हणजे तुझी लज्जा दिसेल.


त्यांमधून आनंदाचा व उल्लासाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन.


सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील, त्याच्या पुत्रपौत्रांचीही सेवा करतील; मग त्याच्या देशाची वेळ येईल तेव्हा बहुत राष्ट्रे व थोर राजे त्याच्याकडून सेवा करवून घेतील.


तरुण जन जाती वाहून नेतात, पोरे लाकडाच्या ओझ्याखाली दबतात,


नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.


शाफीरच्या (सुंदर नगराच्या) रहिवासिणी, नग्न होऊन, लज्जा सोडून चालती हो; सअनानाची रहिवासीण बाहेर निघाली नाही; बेथ-एसलाचा शोक हा तुमच्या विपत्तीचा शेवट नाही.


जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल.


दोघी मिळून दळत असतील, एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल.”1


तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते.


पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan