Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 47:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तू पुष्कळ मसलती करता करता थकलीस; तर तुझ्यावर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळवणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस; आणि तुला जे काय घडणार आहे त्यापासून तुझे रक्षण करो. जे आकाशाचा तक्ता आणि ताऱ्यांकडे पाहून नव चंद्रदर्शन जाहीर करतात, ती माणसे उभे राहून तुझे रक्षण करोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तुला मिळालेल्या सर्व सल्ल्यांनी तू थकली आहेस! तुझे ज्योतिषी पुढे येवोत, नक्षत्र पाहून महिन्याच्या महिने भविष्यकथन करणारे, तुझ्यावर पुढे येणाऱ्या संकटापासून तुझे रक्षण करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 47:13
13 Iomraidhean Croise  

खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.


तू ज्यांच्यासाठी शिणलीस त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे; तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत; तुझा बचाव करणारा कोणी नाही.


अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी, एकाच क्षणी तुला प्राप्त होतील; तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके ह्यांना न जुमानता ती तुझ्यावर पूर्णपणे गुदरतील.


दूरच्या पल्ल्यामुळे तू थकलीस, तरी “आपण आता हात टेकले” असे तू म्हणाली नाहीस; तुला नवा दम आला म्हणून तुला ग्लानी आली नाही.


ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्‍या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बाबेलचे रुंद तट समूळ पाडतील, त्याच्या उंच वेशी अग्नीने भस्म होतील; अशी राष्ट्रांच्या श्रमाची फलप्राप्ती शून्यवत होईल, राष्ट्रांचे श्रमफळ हे अग्नीला भक्ष्य होईल, ते व्यर्थ शिणतील.”


असे करून म्हण की, ‘ह्याच प्रकारे मी बाबेलवर जे अरिष्ट आणणार त्यामुळे तो बुडेल, वर येणार नाही; ते व्यर्थ शिणतील.”’ येथवर यिर्मयाची वचने आहेत.


ती श्रम करून करून भागली तरी तिच्यावर दाट बसलेला गंज निघून गेला नाही; गंजासहित तिला आगीत टाका.


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


पाहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात, हे सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून नव्हे काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan