Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 46:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापतात; तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हलत नाही; त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यांना संकटांतून तारीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 ते आपल्या खांद्यांवर उचलून घेतात आणि वाहून नेतात; तो नेऊन त्याच्या जागी ठेवतात आणि तो त्याच्या जागेवर उभा राहतो व त्या जागेतून हालत नाही. ते त्यास आरोळी मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही किंवा कोणालाही त्याच्या संकटातून वाचवत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात व वाहून नेतात; नंतर ते त्याला त्याच्या स्थानी ठेवतात, तेव्हा ते दैवत तिथेच राहते. त्या ठिकाणाहून त्याला हालता येत नाही. कोणी त्याचा धावा केला, तरी ते उत्तर देऊ शकत नाही; ते कोणालाही त्यांच्या संकटातून सोडवू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 46:7
21 Iomraidhean Croise  

मग त्यांना दिलेला गोर्‍हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत ते बआलाचे नाव घेत, “हे बआला, आमचे ऐक,” असे म्हणत राहिले; पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले.


दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञसमयापर्यंत ते बडबडत राहिले पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही.


एलीया त्यांना म्हणाला, “बआलाच्या संदेष्ट्यांना पकडा; त्यांच्यातल्या एकालाही निसटून जाऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी त्यांना पकडले; एलीयाने त्यांना खाली किशोन ओहळानजीक आणून वधले.


तेव्हा असे झाले की तो आपले दैवत निस्रोख ह्याच्या देवळात पूजा करीत असता त्याचे पुत्र अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याला तलवारीने वधले व ते अरारात देशात पळून गेले. मग त्याच्या जागी त्याचा पुत्र एसर-हद्दोन राजा झाला.


जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो; न ढळणारी अशी मूर्ती बनवण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो.


मी पाहतो तर कोणी दिसेना; मी विचारतो तर त्यांच्यामध्ये उत्तर देईल असा एकही मंत्री नाही.


पाहा, ते सर्व व्यर्थ आहेत, त्यांची कृत्ये निरर्थक आहेत; त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.


ओतार्‍याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणार्‍याने ऐरणीवर घण मारणार्‍याला, धीर दिला आणि “सांधा चांगला बसला आहे” असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवली.


लोहार छिन्नी पाजवतो, तो पेटलेल्या कोळशांनी काम करतो, हातोड्यांनी मूर्तीला आकार आणतो, तो आपल्या बाहुबलाने ती घडतो; त्याला भूक लागते व त्याची शक्ती गळते; तो पाणी प्याला नाही तर व्याकूळ होतो.


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


बेल खचला आहे, नबो वाकला आहे; त्यांच्या मूर्ती पाठाळांवर घातल्या आहेत; तुमच्या मिरवणुकीच्या मूर्ती थकलेल्या जनावरांवर ओझ्याप्रमाणे लादल्या आहेत.


तू ज्यांच्यासाठी शिणलीस त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे; तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत; तुझा बचाव करणारा कोणी नाही.


त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत; त्यांना बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यांना चालता येत नाही; त्यांना भिऊ नका; कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही, व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही.”


यहूदाची नगरे व यरुशलेमकर ज्या दैवतांना धूप जाळतात त्यांच्याकडे जाऊन ते आरोळी मारतील; पण संकटसमयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाहीत.


तर तू आपणांसाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला वाचवतील की काय ते पाहा, कारण हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे.


नबुखद्नेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली, तिची उंची साठ हात व रुदी सहा हात होती; तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दूरा नामक मैदानात केली.


खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले; मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता.


तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हांला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तींकडे ओढले जात होता, हे तुम्हांला ठाऊक आहे.


अश्दोदकर दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून पाहतात तर दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan