Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 46:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 जे थैलीतून सोने ओततात, जे काट्याने रुपे तोलून देतात, त्यांचे दैवत घडवण्यासाठी ते सोनारास मजुरीने लावतात, ते त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 लोक पिशवीतून सोने ओततात आणि चांदी तराजूने तोलतात. ते सोनाराला मोलाने ठेवतात आणि तो त्यांचा देव करतो; ते नतमस्तक होतात आणि उपासना करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 काहीजण त्यांच्या पिशवीतून सोने काढून ते ओततात व चांदी तराजूत तोलतात; ते एखाद्या सोनाराला दैवत घडविण्यासाठी मजुरीने कामाला लावतात, आणि मग ते त्याच्यापुढे नमन करून त्याची पूजा करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 46:6
21 Iomraidhean Croise  

राजाने आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन दोन सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, “आजवर तुमचे यरुशलेमेस जाणे झाले तेवढे पुरे; हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पाहा.”


त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही; पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही.


ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली. त्याला बली अर्पण केले. ‘हे इस्राएला, ज्यांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव,’ असे ते म्हणू लागले आहेत.”


त्यांचा देश मूर्तींनी भरून गेला आहे; ते आपल्या हातांनी घडलेल्या, बोटांनी केलेल्या वस्तूंची पूजा करतात.


तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तींची मढवणी व तुमच्या सोनेरी ओतीव मूर्तींचा मुलामा तुम्ही अपवित्र लेखाल, एखाद्या अमंगळ वस्तूप्रमाणे त्या तुम्ही दूर फेकून द्याल; “चालती हो,” असे तुम्ही मूर्तीस म्हणाल.


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही.


तार्शीशाहून आणलेले रुप्याचे पत्रे व उफाजचे सोने ह्यांचे कारागिराने केलेले, सोनाराच्या हाताने घडलेले काम त्या आहेत, त्यांना निळा, जांभळा पोशाख चढवतात; त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम होत.


त्याच्या जलप्रवाहांना झळ लागेल व ते सुकून जातील; कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे, त्यातील लोकांना मूर्तींचे वेड लागले आहे.


नबुखद्नेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली, तिची उंची साठ हात व रुदी सहा हात होती; तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दूरा नामक मैदानात केली.


ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत, ते आपल्याजवळच्या रुप्याच्या आपणांसाठी ओतीव मूर्ती करीत आहेत; ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत; त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत; ते अशा मूर्तींबरोबर बोलतात, यज्ञ करणारी माणसे वासरांचे चुंबन घेतात.


तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.


Lean sinn:

Sanasan


Sanasan