Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 46:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 “याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व अवशिष्ट लोकहो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले; उदरात होता तेव्हापासून तुम्हांला मी वागवले; माझे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 याकोबाच्या घराण्या आणि याकोबाच्या घराण्यातील वाचलेले सर्व तुम्ही, ज्या तुम्हास मी जन्माच्या पूर्वीपासून, गर्भापासून वाहीले आहे. माझे ऐका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “याकोबाच्या वंशजांनो, इस्राएलच्या सर्व अवशिष्ट लोकांनो, माझे ऐका, तुम्ही जन्माला आल्यापासून मीच तुमचे संगोपन केले आहे, आणि तुमच्या जन्मापासून मीच तुमची काळजी घेतली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 46:3
24 Iomraidhean Croise  

तू आपल्या लोकांना तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे; त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांना सदोदित वाहून ने.


जन्मापासून तूच माझा आधार आहेस; मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस; मी तुझी स्तुती निरंतर करीन.


मी मिसर्‍यांचे काय केले ते व तुम्हांला गरुडाच्या पंखांवर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे;


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


त्या दिवशी असे होईल की इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, आपणांस ताडन करणार्‍याचा ह्यापुढे आश्रय धरून राहणार नाहीत; तर परमेश्वराचा, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आश्रय ते खर्‍या मनाने करतील.


अवशेष, याकोबाचा अवशेष, समर्थ देवाकडे परत येईल.


कारण हे इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या रेतीइतके असले तरी त्यांचा अवशेष मात्र परत येईल; न्यायाने परिपूर्ण असा प्रलय नेमला आहे.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’


मग असे होईल की सीयोनेत उरलेल्या, यरुशलेमेत शेष राहिलेल्या ज्या प्रत्येकाचे नाव यरुशलेमेतील जीवन पावणार्‍यांच्या यादीत लिहिले आहे त्या प्रत्येकाला पवित्र म्हणतील.


हे याकोबा, हे इस्राएला, ह्या गोष्टी स्मरणात ठेव; तू माझा सेवक आहेस; मी तुला घडले आहे, तू माझा सेवक आहेस; हे इस्राएला, तुझा मला विसर पडायचा नाही.


नीतिमत्तेपासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांनो, माझे ऐका.


हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्‍यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे.


“तुम्ही जे नीतिमत्तेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका; ज्या खडकातून तुम्हांला खोदून काढले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हांला खणून काढले त्याकडे लक्ष द्या.


हे नीती जाणणार्‍यांनो, माझे नियमशास्त्र मनात वागवणार्‍यांनो, तुम्ही माझे ऐका; मर्त्य मानव नावे ठेवतील त्यांना भिऊ नका; त्यांच्या निंदेने घाबरू नका.


त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्‍या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.


आणि तुम्ही रानातही पाहिले की, येथवर येऊन पोहचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही आक्रमिला त्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने, मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो तसे तुम्हांला नेले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan