Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 46:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्‍या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत, त्या मी आधीपासून सांगत आलो आहे. मी म्हणतो, “माझ्या योजना सिद्धीस जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी सुरुवातीपासूनच शेवट कळवितो व पुरातन काळातच भावी काळात होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो. मी म्हणतो, ‘माझ्या योजना कायम राहतील, आणि माझ्या इच्छेस येईल ते मी करेन.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 46:10
38 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


तो न बदलणारा आहे, त्याला त्यापासून कोण फिरवणार? आपल्या मनास येते ते तो करतो;


परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो.


परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात.


मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


ह्यास्तव प्रभूने सीयोन डोंगर यरुशलेम ह्यासंबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा ह्याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाख ह्यांचा बदला मी घेईन.


सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की, “मी कल्पिले तसे होईलच; मी योजले तसे घडेलच;


हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस; मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन कारण तू आश्‍चर्यकारक कृत्ये केली आहेस; तू आपले पुरातन संकल्प पूर्ण सत्त्वशीलतेने सिद्धीस नेले आहेत.


गवत सुकते, फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.


परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; याकोबाचा राजा म्हणतो, तुम्ही आपले बळकट पुरावे आणा.


हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्‍यांनाही तो मीच आहे.


“येथून पुढेही मीच तो आहे; माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही; मी करतो ते कोणाच्याने पालटवणार?”


मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली तेव्हापासून माझ्यासारखा संदेश प्रकट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व माझ्यापुढे प्रतिपादन करावे; त्यांनी भावी गोष्टी व आता होणार्‍या गोष्टी सांगाव्यात.


बोला, त्यांना समोर आणा; त्यांना आपापसांत विचार करू द्या; हे कोणी पूर्वीपासून कळवले? हे कोणी पुरातन काळापासून ऐकवले? मी परमेश्वरानेच नव्हे काय? माझ्यावेगळा देव नाही; माझ्यावाचून न्यायी व तारणकर्ता दुसरा कोणी देव नाही.


उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.


तुम्ही सर्व जमा व्हा, ऐका; त्या मूर्तींपैकी कोणी ह्या गोष्टी कळवल्या? परमेश्वराला प्रिय असलेला मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे बाबेलचे करील; तो आपले भुजबल खास्द्यांवर चालवील.


“मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या.


त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.


त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.


तलवारीपासून निभावलेले असे अगदी थोडे लोक मिसर देशातून यहूदा देशात परत जातील; आणि जे यहूदाचे सर्व अवशिष्ट लोक मिसर देशात काही दिवस राहण्यास गेले आहेत त्यांना, माझा शब्द खरा ठरतो की त्यांचा खरा ठरतो, हे कळून येईल.


पाहा, हे प्राप्त होत आहे, घडून येत आहे; मी सांगितला तो हा दिवस आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


शासनाच्या दिवशी एफ्राईम ओसाड होईल; ही खातरीने होणारी गोष्ट मी इस्राएलाच्या वंशांना कळवली आहे.


हे जे त्याला युगादिपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.’


आणि असे होईल की, जो कोणी त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांतून अगदी नष्ट केला जाईल.’


परंतु ते देवाचे असल्यास तुम्हांला ते नष्ट करता यायचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”


म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan