Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 45:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्याला धिक्कार असो! तो मातीच्या खापर्‍यांपैकी एक आहे. ‘तू काय करतोस’ असे माती आपल्या घडणार्‍याला म्हणेल काय? ‘तुला हात नाहीत’ असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय! मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, त्याला धिक्कार असो. जो जमिनीवर पडलेल्या अनेक मडक्याच्या तुकड्यांमधील केवळ एक मडक्याच्या तुकडा आहे. माती कुंभाराला म्हणते काय, ‘हे तू काय घडवित आहेस?’ तुझी हस्तकृती तुला म्हणते काय, ‘कुंभाराला तर हातच नाहीत’?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 45:9
22 Iomraidhean Croise  

तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडवले आहेस हे मनात आण; तर पुन्हा मला मातीस मिळवू पाहतोस काय?


‘तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही,’ म्हणून का तू त्याच्याशी वाद घालतोस?


“हा बोल लावणारा सर्वसमर्थाशी आता वाद घालील काय? देवाशी वाद घालणार्‍याने आता उत्तर द्यावे.”


तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील? ‘तू हे काय करतोस,’ असे त्याला कोण म्हणणार?


तो मनाने सुज्ञ व सामर्थ्याने प्रबल आहे; त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


जे काही झाले आहे त्याला पूर्वीच नाव दिले होते; मनुष्याचे काय होणार हेही पूर्वीच माहीत असते; त्याच्याहून जो समर्थ त्याच्याशी त्याला झगडता येणार नाही.


कुर्‍हाडीने तोडणार्‍यापुढे कुर्‍हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालवणार्‍यापुढे आढ्यता मिरवील काय?सोट्याने आपणास हाती धरणार्‍यास गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतरास उचलावे तसे हे आहे.


धिक्कार असो तुमच्या उलट्या समजाला! माती कुंभाराशी समान असे गणतील काय? “तू मला केले नाहीस” असे कर्त्याला कर्म म्हणेल का? “तुला अक्कल नाही” असे घडलेली वस्तू घडवणार्‍यास म्हणेल काय?


‘तू काय जन्म देतोस?’ असे जो बापाला म्हणतो, आणि ‘तू काय प्रसवतेस?’ असे जो आईला म्हणतो त्याला धिक्कार असो!”’


तुझ्या धावा करणारा कोणी नाही; तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करीत नाही; कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवले आहेस; आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहेस.


तर आता, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत.


“हे इस्राएलाच्या घराण्या, ह्या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात.


आणि यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला तू असे सांग, ‘परमेश्वर म्हणतो, तू हा पट जाळून म्हटले, तू ह्यावर का लिहिले की बाबेलचा राजा येईलच व ह्या देशाचा विध्वंस करील आणि ह्यातून मनुष्य व पशू ह्यांचे निर्मूलन करील?”


हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा मांडला व तू सापडला आहेस, पण तुला कळले नाही; तू सापडलास व तुला पकडलेही, कारण तू परमेश्वराविरुद्ध भांडलास.


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


आपण ‘प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय?’ आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan