Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 45:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले; मी शांती आणतो आणि अनर्थ उत्पन्न करतो; मी परमेश्वर आहे, जो ह्यासर्व गोष्टी करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो. मीच कल्याण व अरिष्ट आणतो, या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 45:7
39 Iomraidhean Croise  

तुझ्या कानावर हे आले नाही काय की मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले की तटबंदी नगरांचा विध्वंस करून त्यांचे ढीग करण्यात यावेत?


तरी तू आपला हा उद्देश मनात लपवून ठेवलास; तुझ्या मनात काय होते ते आता मला समजले;


तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दु:ख घेऊ नये काय?” ह्या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.


त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;


त्याने अंधकार पाठवून काळोख पाडला, आणि त्यांनी त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले.1


परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल; परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.


दिवस तुझा आहे, रात्रही तुझी आहे; चंद्र व सूर्य तूच स्थापन केले.


तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडतो व दुसर्‍याला वर चढवतो.


आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर ―


तो मिसर्‍यांची सेना आणि इस्राएलांची सेना ह्यांच्या दरम्यान आला. तो त्यांना ढग व अंधार होता, तरी त्यांना रात्रीचा प्रकाश देत होता; रात्रभर एका पक्षाला दुसर्‍या पक्षाकडे जाता आले नाही.


तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही; तर दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल.


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


तुझा उद्धारकर्ता, गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, “मी वस्तुमात्राचा कर्ता परमेश्वर आहे; मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला तेव्हा माझ्याजवळ कोण होते?


ह्यामुळे मंत्रतंत्रांनी निवारता येणार नाही अशी विपत्ती तुझ्यावर येईल; खंडणी देऊन टाळता येणार नाही असे अरिष्ट तुझ्यावर येईल; तुझ्या ध्यानीमनी नाही असा नाश तुला एकाएकी गाठील.


जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.


परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.


जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे ह्यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवतो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की,


तू माझा परशू आहेस, तू माझी युद्धशस्त्रे आहेस; तुझ्या द्वारे मी राष्ट्रे मोडून त्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे राज्ये नष्ट करीन.


अनिष्ट व इष्ट ही परात्पराच्या मुखातून येत नाहीत काय?


मी आकाशातील सर्व ज्योती तुझ्यावर निस्तेज करीन, मी तुझ्या देशावर काळोख आणीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो.


अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे; पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


कारण जो पर्वत निर्माण करतो, वारा उत्पन्न करतो, मनुष्याच्या मनातील विचार काय आहेत ह्याची त्याला जाणीव करून देतो, जो प्रभात अंधकारमय करतो आणि पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालतो त्याचे नाम परमेश्वर, सेनाधीश देव, हे आहे.”


परमेश्वरास शरण जा, म्हणजे वाचाल; नाहीतर तो योसेफाच्या घराण्यावर अग्नीसारखा पडून त्याला खाऊन टाकील; त्याला विझवणारा बेथेलात कोणी असणार नाही.


तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करील व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यांना अंधारात उधळून लावील.


ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे.


कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.


ते लज्जारूपी फेस दाखवणार्‍या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेत; त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.


आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan