Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 45:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन; मी पितळी दरवाजाचे तोडून तुकडे तुकडे करीन आणि त्यांच्या लोखंडी सळ्यांचे कापून तुकडे तुकडे करीन

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 हे सायरसा, मी तुझ्यापुढे चालेन, मी पर्वत जमीनदोस्त करेन आणि कास्याच्या वेशी तोडेन व त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 45:2
17 Iomraidhean Croise  

कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले.


उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील.


अगे वेशी, हायहाय कर; अगे नगरी, ओरड; हे पलेशेथा, तू सर्वस्वी वितळून जाशील; कारण उत्तरेकडून धूर येत आहे; त्याच्या सैन्यापैकी कोणी चुकून मागे राहणार नाही.”


नगरात नुसती ओसाडी झालेली आहे; वेशीचा भुगाभुगा झाला आहे.


प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उंचसखल असेल ते सपाट होवो व खडकाळीचे मैदान होवो;


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


मीच न्याय्य दृष्टीने कोरेशाची उठावणी केली; मी त्याचे सगळे मार्ग सरळ करीन; तो माझे नगर बांधील व काहीएक मोल अथवा मोबदला न घेता बंदिवान झालेल्या माझ्या लोकांना मुक्त करील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


मी, केवळ मीच बोललो आहे; मी त्याला बोलावले आहे, त्याला आणले आहे. त्याचा आयुष्यक्रम सफल होईल.


जा, हनन्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन.1


बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बाबेलचे रुंद तट समूळ पाडतील, त्याच्या उंच वेशी अग्नीने भस्म होतील; अशी राष्ट्रांच्या श्रमाची फलप्राप्ती शून्यवत होईल, राष्ट्रांचे श्रमफळ हे अग्नीला भक्ष्य होईल, ते व्यर्थ शिणतील.”


परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.”


तो एडका पश्‍चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस धडका मारीत आहे असे मी पाहिले; कोणी पशू त्याच्यासमोर उभा राहीना, व त्याच्या तडाक्यातून एखाद्यास सोडवायचे कोणास सामर्थ्य नव्हते; तो आपल्या मनास येई तसे करी, असा तो प्रबल झाला.


पाहा, तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत; तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत; अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत.


प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील,


त्या दिवसांत पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये) उभा राहून म्हणाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan