Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 45:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 हे इस्राएलाच्या देवा, तारका, तू खचीत गूढ देव आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 हे परमेश्वरा आणि इस्राएलाच्या तारणकर्त्या, खरोखर तुम्ही परमेश्वर आहात, जे स्वतःला अदृश्य ठेवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 45:15
24 Iomraidhean Croise  

तरी तू आपला हा उद्देश मनात लपवून ठेवलास; तुझ्या मनात काय होते ते आता मला समजले;


देव कोठे सापडेल हे मला समजले असते, मी त्याच्या न्यायासनाजवळ जाऊन पोहचलो असतो, तर किती बरे होते!


डाव्या बाजूस, जेथे तो आपली कृती करतो तिकडे, त्याला मी पाहतो, तरी तो मला दिसत नाही; मी उजवीकडे वळतो, तिकडेही तो मला दिसत नाही;


तू आपले मुख का लपवतोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस?


“ज्यांचा उगम इस्राएलापासून आहे असे तुम्ही, प्रभू जो देव त्याचा जनसभांत धन्यवाद करा.”


समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाहीत.


तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील; आपणांवर जुलूम करणार्‍यांमुळे लोक परमेश्वराचा धावा करतील तेव्हा तो एक उद्धारक व कैवारी पाठवून त्यांना मुक्त करील.


मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.


कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत.


इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही.


मी आपला न्याय जवळ आणत आहे, आता तो दूर नाही; माझ्याकडून होणार्‍या उद्धारास विलंब लागणार नाही; मी सीयोनेत उद्धार स्थापतो, इस्राएलास माझे गौरव देतो.”


त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडन केले, मी विन्मुख झालो, मी त्याच्यावर कोपलो; पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला.


तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील, राजांचे स्तन तू चोखशील, आणि मी परमेश्वर तुला तारणकर्ता, उद्धारकर्ता याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे तू जाणशील.


परमेश्वर याकोबाच्या घराण्यापासून आपले मुख फिरवतो; त्याची वाट मी पाहतो, त्याची आशा धरतो,


येशूने त्याला उत्तर दिले, “मी करतो ते तुला आता कळत नाही; ते तुला पुढे कळेल.”


तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे.


आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचीत ख्रिस्त, जगाचा तारणारा आहे हे आम्हांला कळले आहे.”


ह्या मनुष्याच्या वंशजांतून देवाने त्याच्या वचनाप्रमाणे इस्राएलासाठी येशू हा तारणारा उदयास आणला.


त्याने इस्राएलाला पश्‍चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.


आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात2 वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan