Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 45:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परमेश्वर असे म्हणतो, “मिसराच्या श्रमाचे फळ, कूशाची कमाई व धिप्पाड सबाई लोक तुझ्याजवळ येऊन तुझे होतील; ते तुझ्यामागून येतील; बेड्या घातलेले येतील, तुला दंडवत घालतील. ते तुला विनंती करून म्हणतील की : ‘खरोखर तुझ्याजवळ देव आहे, दुसरा कोणी नाही, दुसरा कोणीच देव नाही.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परमेश्वर असे म्हणतो, मिसराची मिळकत आणि कूशाचा माल, सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्ये आहेत, ही तुजजवळ आणली जातील. ते तुझे होतील. ते तुझ्यामागे साखळ्यांनी बांधलेले येतील. ते तुझ्या पाया पडून तुझ्याजवळ विनंतीकरून म्हणतील, खात्रीने देव तुझ्याबरोबर आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 याहवेह असे म्हणतात: “इजिप्तचे उत्पादन आणि कूशचा सर्व व्यापारी माल व शबाईचे ते उंच लोक— ते तुमच्याकडे येतील ते सर्वकाही तुमचेच होईल. बेड्या घातलेल्या बंदिवानाप्रमाणे ते पाय ओढत तुमच्यामागे चालतील ते साखळदंडाने बांधलेले तुमच्याकडे येतील. तुम्हाला नमन करतील व विनंती करून म्हणतील, ‘निश्चितच परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, दुसरे कोणी नाही; त्यांच्याशिवाय दुसरा देव नाही.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 45:14
41 Iomraidhean Croise  

लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.


गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता, त्याच्या प्रत्येक हाताला व पायाला सहासहा अशी एकंदर चोवीस बोटे होती.


ज्या प्रांतात व ज्या नगरात राजाची आज्ञा व फर्मान जाऊन पोहचले तेथल्या यहूद्यांना मोठा हर्ष झाला आणि त्यांनी भोजनसमारंभ करून तो मंगलदिन म्हणून पाळला आणि त्या देशाचे पुष्कळ लोक यहूदी झाले, कारण त्यांना यहूद्यांचा मोठा धाक बसला.


तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यांना घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले; हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलो आहे.”


तू झोपी जाशील तेव्हा तुला कोणी भिवविणार नाही; बहुत लोक तुझे आर्जव करतील.


परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो; दुधारी तलवार त्यांच्या हाती असो;


त्यांच्या राजांना साखळदंडांनी बांधावे आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्यात.


तेव्हा ते तुझे सर्व सेवक माझ्याकडे येऊन पाया पडून म्हणतील की, आपल्या परिवारासह आपण निघून जावे. त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतप्त होऊन फारोपुढून निघून गेला.


पाहा, प्रभू सेनाधीश परमेश्वर फांद्या भयंकर झपाट्याने छाटत आहे; उंच वाढलेली खोडे तोडून टाकली जात आहेत; उन्नत नीच होत आहेत.


अरे, कूशातील नद्यांपलीकडल्या फडफडणार्‍या पंखांच्या देशा!


त्या वेळेस उंच बांध्याचे व तुळतुळीत अंगाचे लोक, मुळापासून भयंकर, हुकूमत चालवणारे, पादाक्रांत करणारे, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे, त्या लोकांकडून सेनाधीश परमेश्वराचे नाम दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश परमेश्वराला नजराणे अर्पण करण्यात येतील.1


त्या दिवशी परमेश्वर मिसर्‍यांना आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील; ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करतील; ते परमेश्वराला नवस करतील व तो फेडतील.


परमेश्वर मिसर देशास मारील; मारील व बरेही करील; ते परमेश्वराकडे वळतील आणि तो त्यांची विनंती ऐकेल व त्यांना बरे करील.


तिच्या व्यापाराची प्राप्ती व तिची कमाई परमेश्वराला समर्पून पवित्र होईल; ती भांडारात ठेवणार नाहीत; तिचा संचय करणार नाहीत; तर जे परमेश्वराच्या सन्निध असतात त्यांना भरपूर खाण्यास मिळावे व त्यांनी उंची वस्त्रे ल्यावीत म्हणून तिच्या व्यापाराची प्राप्ती त्यांच्या कामी लागेल.


कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत.


भयभीत होऊ नका, थरथर कापू नका; मी मागेच तुला हे ऐकवले आहे व कळवले की नाही? तुम्ही माझे साक्षी आहात, माझ्यावेगळा कोणी देव आहे काय? माझ्यावेगळा कोणी दुर्ग नाही; मला कोणी ठाऊक नाही.”


माझ्याविषयी म्हणतील की केवळ परमेश्वराच्या ठायीच न्याय्यत्व व सामर्थ्य आहे; त्याला प्रत्येक जण शरण येईल; त्याच्यावर संतापलेले सर्व लज्जित होतील.


राजे बापासमान तुझे पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील; ती तुला भूमीपर्यंत लवून नमन करतील. तुझ्या पायांची धूळ चाटतील; तेव्हा मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे फजीत होत नाहीत, असे तुला कळून येईल.”


कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल; तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील; व उजाड झालेली नगरे वसवील.


पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल.


राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.


अन्य राष्ट्रांत त्यांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल; परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यांना पाहणारे कबूल करतील.”


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


तेथे चैनी लोकांची धामधूम चालू झाली; सामान्य पुरुषांबरोबर रानातून आणखी दारूबाज लोक आणण्यात आले; त्यांनी त्यांच्या हातांत बांगड्या घातल्या व डोक्यांना उत्तम शिरोभूषणे घातली.


पाहा, अश्शूर हा लबानोनाचा एक गंधसरू असून त्याला सुंदर फांद्या फुटल्या, त्याची छाया गर्द झाली, तो उंच वाढून त्याचा शेंडा मेघमंडळास जाऊन भिडला.


आणि तुमचे पुत्र व कन्या ह्यांना विकून यहूद्यांच्या हाती देईन आणि ते त्यांना दूरच्या राष्ट्रांना म्हणजे शबाई लोकांना विकतील असे परमेश्वराने म्हटले आहे.”


त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्राएल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली; ते म्हणाले, “जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे; तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत.


त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात; आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व ‘तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ असे बोलून दाखवील.


कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास,


पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan