Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 45:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मीच न्याय्य दृष्टीने कोरेशाची उठावणी केली; मी त्याचे सगळे मार्ग सरळ करीन; तो माझे नगर बांधील व काहीएक मोल अथवा मोबदला न घेता बंदिवान झालेल्या माझ्या लोकांना मुक्त करील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील. तो माझे नगर बांधील; आणि काही मोल किंवा मोबदला न घेता माझ्या बंदिवान झालेल्या लोकांस घरी जाण्यास सोडून देईल. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 माझा न्याय्य हेतू सिद्धीस नेण्यास मीच सायरसला उभारेन: त्याचे सर्व मार्ग मी सरळ करेन. तो माझे शहर पुनर्निर्मित करेल, माझे बंदिवान लोक मोकळे करेल, पण ते तो बक्षीस किंवा मोबदल्यासाठी करणार नाही, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 45:13
19 Iomraidhean Croise  

त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल - त्याच्याबरोबर त्याचा देव असो - त्याने यहूदातील यरुशलेमेस जाऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधावे; यरुशलेमेत जो आहे तोच देव होय.


हे आमच्या तारणार्‍या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस; तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हांला उत्तर देतोस.


तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.


पाहा, मी त्यांच्यावर मेदी लोक उठवीन, ते रुप्याची पर्वा करणार नाहीत व सोन्याने खूश होणार नाहीत.


ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला, व आपल्या बंदिवानांना मुक्त करून घरी जाऊ दिले नाही तो हाच का पुरुष?’


ज्याच्या पावलांना नीतिमत्ता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो; राजांवर त्याची सत्ता बसवतो, तो त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो, व उडणार्‍या धसकटाप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो.


मी उत्तरेकडून एकाची उठावणी केली आहे; तो आला आहे. जो माझे नाम घेतो त्याची मी सूर्याच्या उगवतीकडून उठावणी केली आहे; चिखल तुडवतात किंवा कुंभार मातीचा गारा तुडवतो तसा तो अधिपतीस तुडवील.


“मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे; तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन;


मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’


“परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन.


उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.


परमेश्वर म्हणतो, “हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणार्‍याबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.


परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना फुकट धरून नेले आहे, आणि आता मी येथे काय करू? परमेश्वर म्हणतो, त्यांच्यावर प्रभूत्व करणारे गर्जना करीत आहेत, दिवसभर एकसारखी माझ्या नामाची निंदा होत आहे.


हे सीयोनकन्ये, तुला कापरे भरू दे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे; कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलपर्यंतही जाशील, तेथे तुझी सुटका होईल. तेथे परमेश्वर तुला तुझ्या वैर्‍यांच्या हातून सोडवील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan