Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 45:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो, ज्याच्यापुढे राष्ट्रे जिंकायला त्याचा उजवा हात मी धरला आहे, आणि ज्याच्यापुढे दरवाजे उघडायला मी राजास निशस्त्र करीन, म्हणून वेशी उघड्या राहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश, कोरेशने अनेक देश जिंकावे आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. मी त्याच्यासाठी दारे उघडेन; यापुढे या वेशी बंद होणार नाहीत:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 45:1
31 Iomraidhean Croise  

परमेश्वर त्याला म्हणाला, “तू परत दिमिष्काच्या रानाकडे जा, तेथे जाऊन पोहचलास म्हणजे हजाएलाला अभिषेक करून अरामावर राजा नेम.


यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली; तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फर्मानही पाठवले, ते असे :


“पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गींचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध;


तो सरदारांवर उपहासाचा वर्षाव करतो, प्रबलांचा कमरबंद सैल करतो.


तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस.


उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील.


मी आपल्या पवित्र केलेल्या जनांना आज्ञा केली आहे, माझ्या क्रोधास्तव माझ्या वीरांना, अभिमानाने उल्लास पावणार्‍या माझ्या लोकाना मी बोलावले आहे.


कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.”


ज्याच्या पावलांना नीतिमत्ता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो; राजांवर त्याची सत्ता बसवतो, तो त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो, व उडणार्‍या धसकटाप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो.


मी उत्तरेकडून एकाची उठावणी केली आहे; तो आला आहे. जो माझे नाम घेतो त्याची मी सूर्याच्या उगवतीकडून उठावणी केली आहे; चिखल तुडवतात किंवा कुंभार मातीचा गारा तुडवतो तसा तो अधिपतीस तुडवील.


“मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे; तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन;


मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’


मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले,


मी, केवळ मीच बोललो आहे; मी त्याला बोलावले आहे, त्याला आणले आहे. त्याचा आयुष्यक्रम सफल होईल.


आता हे सर्व देश मी आपला सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती दिले आहेत; त्याची सेवाचाकरी करण्यास वनांतील पशूही मी त्याला दिले आहेत.


आणि त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, माझा सेवक नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणीन व हे जे धोंडे मी लपवून ठेवले आहेत त्यांवर त्याचे सिंहासन ठेवीन; मग तो त्यांवर आपला भव्य गालिचा पसरील.


कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे; ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही; मनुष्यापासून पशूपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत.


परमेश्वर म्हणतो, खास्द्यांवर तलवार उपसली आहे; आणि ती बाबेलचे रहिवासी, तिचे सरदार व तिचे ज्ञानी ह्यांच्यावर उपसली आहे.


बाण पाजवा! ढाली धारण करा! परमेश्वराने मेद्यांच्या राजांना स्फूर्ती दिली आहे, नाश करावा अशी त्याच्याविरुद्ध त्याची योजना आहे; कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्या मंदिराविषयीचा सूड आहे.


बाबेलचे वीर लढाई करायचे थांबले आहेत, ते आपल्या दुर्गात बसून राहिले आहेत; त्यांचे बल खुंटले आहे. ते केवळ स्त्रिया बनले आहेत; त्याच्या वस्तीस आग लावली आहे; त्याचे अडसर मोडले आहेत.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बाबेलचे रुंद तट समूळ पाडतील, त्याच्या उंच वेशी अग्नीने भस्म होतील; अशी राष्ट्रांच्या श्रमाची फलप्राप्ती शून्यवत होईल, राष्ट्रांचे श्रमफळ हे अग्नीला भक्ष्य होईल, ते व्यर्थ शिणतील.”


त्याच्या श्रमाचा मोबदला म्हणून मी त्याला मिसराचा मुलूख देईन, कारण हे श्रम त्यांनी माझ्यासाठी केले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.


मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते; ते एक अंग वर करून उभे राहिले, त्याने आपल्या तोंडात, आपल्या दातांमध्ये तीन फासोळ्या धरल्या होत्या; लोक त्याला म्हणाले, “ऊठ, पुष्कळ मांस खा.”


मी डोळे वर करून पाहिले तर मला नदीसमोर दोन शिंगांचा एक एडका दिसला; ती दोन्ही शिंगे मोठाली होती; त्यांतले एक दुसर्‍याहून मोठे असून मागाहून निघाले होते.


तो एडका पश्‍चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस धडका मारीत आहे असे मी पाहिले; कोणी पशू त्याच्यासमोर उभा राहीना, व त्याच्या तडाक्यातून एखाद्यास सोडवायचे कोणास सामर्थ्य नव्हते; तो आपल्या मनास येई तसे करी, असा तो प्रबल झाला.


नदीकडील दरवाजे खुले केले आहेत; राजवाडा कोसळला आहे.


पाहा, तुझ्यात राहणारे लोक केवळ स्त्रिया आहेत; तुझ्या देशाचे दरवाजे तुझ्या शत्रूंना खुले झाले आहेत; अग्नीने तुझे अडसर खाऊन टाकले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan