Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 44:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे; मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘तिच्यात वस्ती होवो;’ यहूदाच्या नगरांविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन;’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मी परमेश्वर! जो आपल्या सेवकाची घोषणा परिपूर्ण करतो आणि आपल्या दूतांचा सल्ला सिद्धीस नेणारा, जो यरूशलेमेविषयी म्हणतो की, ती वसविली जाईल आणि यहूदाच्या नगराविषयी म्हणतो की, ती पुन्हा बांधली जातील आणि मी त्याच्या उजाड जागेची उभारणी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 जो त्याच्या सेवकाच्या वचनांना पाठिंबा देतो आणि त्याच्या संदेशवाहकांच्या भविष्यवाण्यांची परिपूर्ती करतो, जो यरुशलेमविषयी म्हणतो, ‘मी यरुशलेम पुनः रहिवासित करेन,’ यहूदीयाच्या नगराविषयी म्हणतो, ‘ती पुनः बांघली जाईल,’ आणि तेथील भग्नावशेषाविषयी म्हणतो, ‘मी त्यांची पुनर्बांधणी करेन,’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 44:26
53 Iomraidhean Croise  

तेव्हा लोकांनी बाहेर पडून अरामी लोकांचे डेरे लुटले. ह्याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार एका शेकेलाला मापभर सपीठ व एका शेकेलाला दोन मापे सातू विकू लागले.


देवाचा माणूस राजाला म्हणाला होता की, “उद्या ह्याच वेळेस शोमरोनाच्या वेशीत एका शेकेलाला दोन मापे सातू व एका शेकेलाला एक माप सपीठ मिळेल.” तसेच झाले.


त्याप्रमाणेच त्याचे झाले; वेशीत लोकांची गर्दी झाली होती त्यांच्या पायांखाली तो सापडला आणि मेला.


ह्या प्रकारे याजक, लेवी, कित्येक सामान्य लोक, गायक, द्वारपाळ आणि नथीनीम हे आपापल्या नगरात राहिले; असे सर्व इस्राएल आपापल्या नगरात पुन्हा वस्ती करून राहिले.


त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे; यरुशलेमेचा तटही पडला आहे, व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत.”


मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत; माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही?”


त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे; त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.


परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवतो; इस्राएलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो.


कारण देव सीयोनेचे तारण करील, तो यहूदाची नगरे बांधील; लोक तेथे राहतील व ते त्यांच्या ताब्यात येईल.


ते त्यांच्या दासांच्या संततीचेही वतन होईल; ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील.


वधण्याचा समय व बरे करण्याचा समय; मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो;


सीयोनेस सुवार्ता सांगणारे,1 उंच डोंगरावर चढ; यरुशलेमेस सुवार्ता सांगणारे,1 आपला स्वर जोराने उंच कर; कर उंच, भिऊ नकोस; यहूदाच्या नगरांना म्हण, “तुमचा देव पाहा.”


माझ्या सेवकाखेरीज कोण आंधळा आहे? मी पाठवतो त्या माझ्या दूतासारखा कोण बहिरा आहे? माझ्या भक्तासाराखा कोण आंधळा आहे? परमेश्वराच्या सेवकासारखा कोण आंधळा आहे?


पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.”


परमेश्वर म्हणतो, “प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो.


यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे.


कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल; तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील; व उजाड झालेली नगरे वसवील.


त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.


बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील; पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील; मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल.


परदेशचे लोक तुझे कोट बांधत आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करत आहेत; कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडन केले तरी आता मी प्रसन्न होऊन तुझ्यावर दया केली आहे.


ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील; उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील.


पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.”


कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्याला पाठवले आहे.”


परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेर्‍यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वसतिस्थानांवर दया करीन; नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील, आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल.


हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्‍यांनी भूषित होशील व उत्सव करणार्‍यांबरोबर नृत्य करशील.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, घरेदारे, शेते, द्राक्षांचे मळे ह्यांची ह्या देशात पुन्हा खरेदी चालू होईल.’


बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत, यहूदाच्या नगरांत, डोंगराळ प्रदेशातील नगरांत, मैदानातल्या नगरांत व दक्षिणेकडल्या नगरांत लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदीखते करतील, त्यांवर शिक्का मारतील व साक्षीदार घेतील; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”


मी यहूदाचा बंदिवास व इस्राएलाचा बंदिवास उलटवीन व त्यांना पूर्ववत स्थापीन.


मी तुमच्यावर माणसांची, इस्राएलाच्या एकंदर सर्व घराण्याची संख्या वाढवीन; नगरे वसतील; पडीत स्थळे बांधून काढतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे इस्राएलाचे संदेष्टे त्यांच्या द्वारे पुरातन काळी ज्याविषयी मी बोललो होतो आणि त्या काळी बहुत वर्षे त्यांनी ज्याविषयी असा संदेश दिला होता की, मी तुला त्यांच्यावर चाल करण्यास आणीन, तो तूच ना?


त्याने आमच्यावर मोठे अरिष्ट आणले; जी वचने तो आमच्याविरुद्ध व आमचा न्याय करणार्‍या न्यायधीशांविरुद्ध बोलला ती त्याने प्रत्ययास आणून दिली आहेत; यरुशलेमेवर जशी विपत्ती आली तशी सर्व जगावर कधी आली नाही.


हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त,1 अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर1 धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक ह्यांसह बांधतील.


मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील.


मग परमेश्वराचा निरोप्या हाग्गय ह्याने परमेश्वराचा निरोप लोकांना कळवला; तो म्हणाला, “मी तुमच्याबरोबर आहे,” असे परमेश्वर म्हणतो.


पुन्हा पुकारून सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरून जातील; परमेश्वर पुन्हा सीयोनेचे सांत्वन करील, तो पुन्हा यरुशलेमेस निवडील.”’


असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”


त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल.


तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, ‘यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल.


पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.


कारण मी तुम्हांला खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.


मग तो त्यांना म्हणाला, “मी तुमच्याबरोबर असताना तुम्हांला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यांत माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan