Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 44:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 व्यर्थ बोलणाऱ्याचे शकून मी निष्फळ करतो आणि जे शकून वाचतात त्यांना काळिमा लावतो; जो मी ज्ञानाचे ज्ञान मागे फिरवतो आणि त्यांचे सल्ले मूर्खपण करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे जे व्यर्थ करतात आणि दैवप्रश्न करणाऱ्यांना मूर्ख ठरवितात, जो सुज्ञ माणसांचे ज्ञान उलथून टाकतो आणि ते निरर्थक बनवितो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 44:25
30 Iomraidhean Croise  

कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”


त्या काळात अहीथोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे; दावीद व अबशालोम ह्या दोघांना जी मसलत तो देत असे ती अशीच असे.


आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले.


राजा मरण पावल्यावर त्याला शोमरोनाला नेले; शोमरोन येथे त्यांनी त्याला मूठमाती दिली.


सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणे भाषण करू लागून म्हणाले, “रामोथ-गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो; कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”


त्या दिवशी घनघोर युद्ध झाले; अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून संध्याकाळपर्यंत उभा राहिला होता; सूर्यास्तसमयी त्याचा प्राण गेला.


राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.


गळवांमुळे जादुगारांना मोशेपुढे उभे राहवेना कारण जादुगार आणि सर्व मिसरी लोक ह्यांना गळवे आली होती.


मिसराच्या अंगची हिंमत खचेल; त्याची मसलत मी व्यर्थ करीन; ते मूर्तींना, मांत्रिकांना, भूतवैद्यांना व गारुड्यांना प्रश्‍न विचारतील.


तर पाहा, मी ह्या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो; मी अद्भुत व आश्‍चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल.”


अदोमाविषयी : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना?


वाचाळांवर तलवार उपसली आहे; ते वेडे बनतील, त्याच्या वीरांवर तलवार उपसली आहे; ते फजीत होतील.


मी त्याचे सरदार, त्याचे ज्ञानी, त्याचे अधिपती व नायब अधिपती, आणि त्याचे वीर ह्यांना मस्त करीन; ते कायमचे निद्रावश होतील, ते उठायचे नाहीत, असे सेनाधीश परमेश्वर, हे नाम धारण करणारा राजेश्वर म्हणतो.


ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतींत राजा त्यांना जे काही विचारी त्यांत ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे त्याला दिसून येई.


तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी व दैवज्ञ हे आत आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्यापुढे मांडले; पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही.


समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.


द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजीत होतील; ते सर्व आपली दाढी झाकतील कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही.


कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे.


याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत; इस्राएलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्राएल ह्यांच्याविषयी असे म्हणतील, ‘देवाने केवढे कार्य केले!’


Lean sinn:

Sanasan


Sanasan