यशायाह 44:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हे आकाशा, जयघोष कर, कारण परमेश्वराने हे केले आहे; अहो पृथ्वीच्या अधोभागांनो, हर्षनाद करा; अहो पर्वतांनो, हे वना, त्यातील प्रत्येक वृक्षा, तुम्ही जयजयकार करा; कारण परमेश्वराने याकोबाला उद्धरले आहे; तो इस्राएलाच्या ठायी आपला प्रताप प्रकट करतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 अहो, आकाशांनो, गायन करा, तुम्ही पृथ्वीच्या खालील अधोलोकांनो आरोळी मारा; अहो पर्वतांनो व रान, त्यातली सर्व झाडे गायन करा; कारण परमेश्वराने याकोबास उद्धारीले आहे आणि इस्राएलात आपले प्रताप दाखविले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 अहो आकाशांनो, आनंद गीते गा, कारण याहवेहने हे अद्भुत कृत्य केले आहे; हे खालील पृथ्वी, गर्जना कर, हे पर्वतांनो, अरण्यांनो आणि सर्व वृक्षांनो, गायनाचा कल्लोळ उसळू द्या. कारण याहवेहने याकोबाचा उद्धार केला आहे. इस्राएलमध्ये त्यांनी त्यांचे गौरव प्रकट केले आहे! Faic an caibideil |